विहरित पडून मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विहरित पडून मृत्यू
विहरित पडून मृत्यू

विहरित पडून मृत्यू

sakal_logo
By

विहिरीत बुडून वृद्धेचा मृत्यू
इचलकरंजी, ता. ३१ : तारदाळ (ता. हातकणंगले) येथे विहिरीत पाय घसरून पाण्यात बुडून वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. शेवंता पांडुरंग कारंडे (वय ७४) असे त्यांचे नाव आहे. रविवारी (ता. ३०) दुपारी साडेबाराच्या सुमारास शेतातून घरी जाते, असे सांगून कारंडे या शेतातून निघून गेल्या. मात्र त्या मिळून आल्या नसल्याने त्यांचा शोध सुरू केला. शोध सुरू असताना शेताच्या वाटेवर असणाऱ्या एका विहिरीच्या काठावर त्यांचे चप्पल आढळून आले. विहिरीत शोध घेतला असता त्यांचा मृतदेह आढळला. विहिरीच्या काठावरून जात असताना तोल गेल्याने पाय घसरला आणि विहिरीच्या पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याची वर्दी लक्ष्मण कारंडे यांनी शहापूर पोलिस ठाण्यात दिली.