इचलकरंजी परिसरातील संक्षिप्त बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजी परिसरातील संक्षिप्त बातम्या
इचलकरंजी परिसरातील संक्षिप्त बातम्या

इचलकरंजी परिसरातील संक्षिप्त बातम्या

sakal_logo
By

59654
इचलकरंजी : स्मिता पाटील कलापथकाच्या कलाकारांनी संविधान पथनाट्यातून नफरत छोडो-संविधान बचाओ अभियानाचा प्रसार केला.

स्मिता पाटील कलापथकाकडून
संविधान बचाओ अभियानाचा प्रसार
इचलकरंजी : स्मिता पाटील कलापथकाच्या कलाकारांनी संविधान पथनाट्यातून नफरत छोडो-संविधान बचाओ अभियानाचा प्रसार केला. मंगळवारी (ता. १) कोल्हापूर जिल्ह्यात होणाऱ्या नफरत छोडो संविधान बचाओ रॅलीत नागरिकांनी सहभागी व्हावे, याच्या प्रचार, प्रसारासाठी संविधानावरील पथनाट्य राष्ट्र सेवा दल, स्मिता पाटील कलापथकाच्या कलाकारांनी महात्मा फुले पुतळा परिसरात सादर केले. यामध्ये दामोदर कोळी, सौरभ पोवार, वैभवी आढाव, हजारे, रोहित दळवी, आदित्य धनवडे, पवन होदलूर आदींनी कलाकार म्हणून काम केले. संयोजन समन्वयक इस्माईल समडोळे, राहुल खंजिरे, अशोक वरुटे आदींनी पुढाकार घेतला. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष सुनील पोवार, युवराज शिंगाडे, राजू गांजवे, तसेच नागरिक उपस्थित होते
--------
59655
इचलकरंजी : व्यंकटेश महाविद्यालयात ‘नॅक’बाबत एक दिवसीय चर्चासत्रात बोलताना प्रा. डॉ. नीलेश पवार.

व्यंकटेश महाविद्यालयात चर्चासत्र
इचलकरंजी : श्री व्यंकटेश महाविद्यालयात नॅकबाबत एक दिवसीय चर्चासत्र झाले. ‘आय.क्यू.ए.एस.ची भूमिका’ या विषयावर नॅक विभागाअंतर्गत या चर्चासत्राचे आयोजन केले होते. नॅक तपासणी ही महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या भौतिक सुविधा, शैक्षणिक सुविधा सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होते, असे प्रतिपादन न्यू कॉलेज, कोल्हापूर येथील प्रा. डॉ. नीलेश पवार यांनी केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. व्ही. ए. माने होते. उपप्राचार्य प्रा. डॉ. एन. एम. मुजावर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. एस. एन. जरंडीकर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. मोहिनी आंचलिया हिने सूत्रसंचालन केले. डॉ. बी. एन. कांबळे यांनी आभार मानले.
------------
‘प्रबोधन’तर्फे दिवाळी अंक योजना
इचलकरंजी : समाजवादी प्रबोधिनीच्या प्रबोधन वाचनालयातर्फे प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही साहित्य रसिकांसाठी ‘दिवाळी अंक’ ही योजना सुरू केली आहे. या योजनेची सुरुवात अजीज शेडबाळे, अर्चना दातार, मल्लिकार्जुन तेगी, जगन्नाथ पोवार, विठ्ठलदास जाजू, अल्लाबक्ष मुजावर, प्रल्हाद मेटे आदी सभासदांनी योजनेचे सभासद होऊन केली. शंभराहून अधिक वर्षांची परंपरा असलेले दिवाळी अंक हे मराठी साहित्य-संस्कृतीचे एक आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे. प्रबोधन वाचनालयातर्फे प्रतिवर्षी उत्तमोत्तम दिवाळी अंक वाचकांसाठी उपलब्ध करून दिले जातात. यावर्षीही तसेच अंक वाचकांसाठी उपलब्ध आहेत. प्रबोधन वाचनालयाच्या दिवाळी अंक योजनेचा आणि वाचनालयातील ग्रंथ संग्रहाचा लाभ इचलकरंजी आणि परिसरातील साहित्य रसिकांनी सभासद होऊन घ्यावा, असे आवाहन वाचनालयाने केले आहे.