विद्युत सर्वेक्षणाची आवश्यकता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्युत सर्वेक्षणाची आवश्यकता
विद्युत सर्वेक्षणाची आवश्यकता

विद्युत सर्वेक्षणाची आवश्यकता

sakal_logo
By

संग्रहित
---------
विद्युत सर्वेक्षणाची आवश्यकता
ऊस जळाल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांतून मागणी
ऋषीकेश राऊत : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २ : गळीत हंगाम सुरू होताच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यंदाही महावितणकडून निराशाची हमी मिळणार, अशी शक्यता आहे. ऊस फडाच्या आगीच्या घटनांची ठिणगी आता पडू लागली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी तोडणीला आलेले ऊस क्षेत्र धोक्यात आले आहे. दोन वर्षापासून गळीत हंगामातील ऊस जळाल्याच्या घटना लक्षात घेऊन विद्युत सर्वेक्षणाची मागणी शेतकऱ्यांतून वाढत आहे. मात्र यासाठी महावितरणची यंत्रणा रामभरोसे ठरत आहे. त्यामुळे आता विद्युत सर्वेक्षणातून व्यापक उपाययोजना राबवत उसाच्या आगीच्या घटनांवर नियंत्रण आणणे महत्त्‍वाचे आहे.
दोन वर्षात लोबंकाळणाऱ्या व नादुरुस्त तारांमुळे शॉर्टसर्किट होऊन तोडणीला आलेले ऊस पीक जळून खाक झाल्याच्या घटना शिरोळ, हातकणंगले तालुक्यात अनेक ठिकाणी घडत आहेत. उसाच्या शेतीत लोंबकळणाऱ्या विद्युत वाहिन्यांपासून काही नुकसान होण्याचा संभव कमी असतो. मात्र ऊसतोडणी आणि ऊस वाहने शेतात गेली की लोंबकळणाऱ्या तारांचे घर्षण होऊन आग लागते. वाळलेला उसाचा पाला, उन्हाचा तडाखा, वारा यामुळे ही आग पाहता पाहता दूरवर जाते. एका ठिकाणी लागलेल्या आगीमुळे अख्खे उसाचे पीकच भस्मसात होते. यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी केवळ नुकसान पडत आहेत. वर्षभर काबाडकष्ट करून उभे केलेले पीक विजेच्या तारांमुळे मातीमोल होत असल्याचे शेतकऱ्यांना उघड्या डोळ्यांनी पहावे लागत आहे.
पीक कर्ज तसेच जुळवाजुळव करून ऊस पिकासाठी वर्षभर राबलेले शेतकरी यामुळे आर्थिक चक्रव्यूहात सापडत आहेत. यासाठी शेतकरी दोन वर्षांपासून महावितरणच्या पायऱ्या चढत आहेत. याची दखल घेत गतवर्षी विद्युत वाहिनी सर्वेक्षणाची मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. मात्र अपेक्षित काम महावितरणकडून झाले नाही. याचा फटका शेतकऱ्यांना सोसावा लागला. महापूर, अतिवृष्टी यांमधून पोटच्या मुलाप्रमाणे जपलेल्या उसाला आता महावितरणची सुरक्षा हवी आहे. खर कारखान्यांचा गळीत हंगामाचा प्रारंभ झाला असून आता ऊस तोडणी हळूहळू सुरू झाली आहे. त्यामुळे मागील हंगामातील ऊस जळाल्याच्या घटना लक्षात घेऊन विद्युत सर्वेक्षणाची मागणी शेतकऱ्यांतून वाढू लागली आहे. ऊस तोडण्याआधी उपाययोजना केल्या तरच शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टळणार आहे.
- - - -
चौकट
सर्वेक्षणाचा आराखडा हवाच
विद्युत पोल उभारून अनेक ठिकाणी वीज पोहोचवली जाते. हे पोल सर्रासपणे शेतातूनच गेलेले आहेत. एकदा विद्युत वाहिन्या जोडून काम पूर्ण झाले की याची दुरुस्ती आणि तपासणी होणे गरजेचे आहे. प्रत्येकवेळी लोंबकाळनाऱ्या तारा, मोडलेले पोल याची माहिती शेतकऱ्यांकडूनच महावितरणला समजते. त्यामुळे महावितरणने वर्षभरात एकदा तरी लोंबकाळनाऱ्या तारासह विस्तृत असा विद्युत सर्वेक्षणाचा आराखडा तयार करून राबवणे गरजेचे आहे.
- - - - - -- -
कोट
उसातून गेलेल्या तारांच्या घर्षणामुळे ऊस जळुन नुकसान होतच आहे. यंदाही तिच परिस्थिती असून पुन्हा आग लाग लागून नुकसान होऊ शकते. त्यामुळे महावितरणने ऊस तोडणीआधी लोंबकाळणाऱ्या तारांचा बंदोबस्त करून उसाला संरक्षण द्यावे. तरच ऊस उत्पादन कारखान्याला पोहोचेल आणि नुकसान टळेल.
विश्वास बालिघाटे, शेतकरी
- - - -