देश जोडणारा आवाज बुलंद करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देश जोडणारा आवाज बुलंद करा
देश जोडणारा आवाज बुलंद करा

देश जोडणारा आवाज बुलंद करा

sakal_logo
By

04828
इचलकरंजी : शहरात काढलेल्या नफरत छोडो, संविधान बचाओ भारत जोडो रॅलीत सहभागी प्रा. योगेंद्र यादव व विविध पक्षांचे पदाधिकारी संविधान प्रेमी नागरिक.
--------------
देश जोडणारा आवाज बुलंद करा
प्रा. योगेंद्र यादव; इचलकरंजीत नफरत छोडो, संविधान बचाव संवाद मेळावा
इचलकरंजी, ता. २ : देशात आज दोनच आवाज आहेत. एक देश जोडणारा आणि एक देश तोडणारा. आम्हाला देश जोडणारा आवाज बुलंद करायचा आहे, असे प्रतिपादन स्वराज्य अभियानचे राष्ट्रीय नेता व राजकीय विश्लेषक प्रा. योगेंद्र यादव यांनी व्यक्त केले. भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ समाजवादी प्रबोधिनीत येथे आयोजित नफरत छोडो, संविधान बचाव संवाद मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार राजूबाबा आवळे होते.
आमदार राजूबाबा आवळे, मदन कारंडे, शशांक बावचकर, नितीन जांभळे, राहुल खंजिरे यांनी मनोगत व्यक्त केले. मिलिंद कोले, सौ. बेडगे, ललित बाबर, सुभाष लोमटे, मानव कांबळे, शामराव नकाते आदी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक इस्माईल समडोळे यांनी केले. दरम्यान, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून समाजवादी प्रबोधिनी अशी मुख्य मार्गावरून पदयात्रा काढली. सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी पथनाट्य व गीत सादर केले.
--
कबनूरमध्ये स्वागत
कबनूर : केंद्र आणि अनेक राज्यामध्ये सत्तेत असलेल्या सांप्रदायिक सरकारच्या विरोधात असणाऱ्या ‘भारत जोडो’ यात्रेला समर्थन देण्यासाठी जनआंदोलनातर्फे ‘नफरत छोडो-संविधान बचाओ-भारत जोडो’ जनसंवाद यात्रेनिमित्त स्वराज्य इंडियाचे अध्यक्ष, विचारवंत समीक्षक आणि किसान नेते योगेंद्र यादव यांचे येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार चौक येथे कबनूर शहर काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना व महाराष्ट्र सामाजिक परिवर्तन परिषदेतर्फे स्वागत केले.
---------
घोषणांनी परिसर दणाणला
जयसिंगपूर : भारत जोडो यात्रा ७ नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्यात प्रवेश करीत आहे. या यात्रेमुळे देशाचा मूड बदलला असल्याचे चित्र दिसून येत आहे. आपल्याला देश जोडायचा आहे तोडायचा नाही. देशाला वाचवणे हे प्रथम कर्तव्य आहे. त्यासाठी या यात्रेचे समर्थन करूया भावनिक साद प्रमुख मार्गदर्शक योगेंद्र यादव यांनी घातली. दसरा चौक येथुन सुरू झालेली जनसंवाद यात्रा क्रांती चौकातून विक्रमसिंहराजे क्रीडांगणावर आली. यावेळी ते बोलत होते. ‘नफरत छोडो भारत जोडो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. व्यासपीठावर माजी आमदार उल्हास पाटील, सुभाष लोमटे, ललित बाबर, मानव कांबळे, डॉ महावीर अक्कोळे, रघुनाथ देशिंगे, डॉ. चिदानंद आळवेकर, सुभाष भोजणे, नितीन बागे, शेखर पाटील आदी उपस्थित होते.