मंजुरीपत्र नेण्याचे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंजुरीपत्र नेण्याचे आवाहन
मंजुरीपत्र नेण्याचे आवाहन

मंजुरीपत्र नेण्याचे आवाहन

sakal_logo
By

मंजुरीपत्र नेण्याचे आवाहन
इचलकरंजी : संजय गांधी योजना कार्यालयात मंजूर झालेल्या लाभार्थ्यांची पत्रे वर्षभर पडून आहेत. त्यांनी संपर्क कार्यालयातून पत्रे घेण्याचे आवाहन प्रभारी नायब तहसीलदार अमित डोंगरे यांनी केले आहे. संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना व इंदिरा गांधी विधवा व वृद्धापकाळ योजनेमधील विविध लाभार्थ्यांची नावे बैठक घेऊन मंजूर केली जातात. २८ फेब्रुवारी, ३१ मार्च, ३० जून २०२०, ४ फेब्रुवारी २०२१, १२ जुलै २०२१ च्या बैठकीमधील पात्र लाभार्थ्यांच्या मंजुरीपत्राचे वाटप संजय गांधी निराधार योजना कार्यालय इचलकरंजी येथे उद्या (ता.४ ) सकाळी अकरा ते सायंकाळी पाच यावेळेत करण्यात येणार आहे. ज्या लाभार्थ्यांनी मंजुरीपत्र घेतले नाही, त्यांनी मंजुरीपत्र घेऊन जावे, असे आवाहन केले आहे.