दोन घरफोड्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन घरफोड्या
दोन घरफोड्या

दोन घरफोड्या

sakal_logo
By

शहापूरला दोन ठिकाणी घरफोड्या
एकूण तीन लाखांच्या मुद्देमालावर डल्ला

इचलकरंजी, ता. २ : शहापूर हद्दीत दोन ठिकाणी चोरट्यांनी घरफोड्या केल्या. योगाश्रम रोड आणि तोरणानगर भागात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप उचकटून एकूण तीन लाखाच्या मुद्देमालावर डल्ला मारला. योगाश्रम रोडवरील बंद घराचे कुलूप तोडून रोख रक्कम आणि ४ तोळ्याचे सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ३० ऐवज पळविला. तर तोरणानगरमध्ये झालेल्या चोरीत रोख रक्कम आणि ४ तोळ्याचे सोन्याचे दागिने असा १ लाख ७० हजारांचा ऐवज पळविला. दोन्ही घटनांची शहापूर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. शहापूर हद्दीत घरफोड्यांचे सत्र सुरू असताना एक दिवसानंतर पुन्हा या दोन घरफोड्या झाल्या आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, घराला कुलूप घालून अमोर राजू हजारे (रा. शहापूर योगाश्रम रोड) कुटुंबीयांसह सांगवडे (ता. करवीर) येथे गेले होते. परत तिथून ते बिरदेववाडी(ता. हातकणंगले) येथील पोल्ट्रीत आले. आज दुपारी ते घरी परतले असता घराचे कुलूप तोडल्याचे दिसले. तिजोरीचे लॉकर तोडल्याचे त्यांना निदर्शनास आले. सोन्याचा दिड तोळ्याचा लप्पा, १ तोळ्याचे झुबे, फुले, अर्धा तोळ्याचे टॉप्स यांसह सुमारे ४ तोळ्याचे दागिने आणि रोख १० हजार लंपास झाल्याचे निदर्शनास आले.
शहापूर, तोरणानगर येथील महेश आसंगी ( वय ३३ रा. शहापूर) हे मुलाच्या वाढदिवसासाठी कुटुंबीयांसह घर बंद करून सासरी शेडशाळला गेले होते. मंगळवारी (ता. १) रात्री ते घरी परतले असता घराला तुटलेले कुलूप दिसले. घरातील तिजोरीत पाहणी केली असता लॉकर तोडून साहित्याची नासधूस केल्याचे निदर्शनास आले. त्यातील रोख ५० हजार आणि सोन्याच्या १ तोळ्याच्या २ अंगठ्या, प्रत्येकी 1 तोळ्याचे बोरमाळ आणि माळ असे 4 तोळ्याचे सोन्याचे दागिने असा सुमारे १ लाख ७० हजारांचा ऐवज चोरट्यांनी पळविला.

चौकट
असुरक्षित वातावरण
गेल्या महिन्याभरापासून शहापूर हद्दीत गुन्हेगारीत वाढ झाली आहे. महिन्याच्या कालावधीत दोन खून तर चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. लागोपाठ घरफोड्यांमुळे नागरिक असुरक्षित बनले आहेत. या आठवड्याभरात मारामारी, खून, घरफोड्यांच्या घटना सलग घडल्या आहेत.