कांद्याच्या दरात १५ रुपयांनी वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कांद्याच्या दरात १५ रुपयांनी वाढ
कांद्याच्या दरात १५ रुपयांनी वाढ

कांद्याच्या दरात १५ रुपयांनी वाढ

sakal_logo
By

04835
04834
इचलकरंजी : बाजारात गाजराची आवक सुरू झाली असून फळ बाजारात नागपूरची संत्री दाखल होत आहेत.
----------
कांद्याच्या दरात १५ रुपयांनी वाढ
स्थानिक गाजराची आवक; फळ बाजारात नागपूरची संत्री दाखल
इचलकरंजी, ता. ३ : कांद्याची आवक अचानक कमी झाली आहे. त्यामुळे कांद्याचे दर किरकोळ बाजारात वाढत आहेत. किलोमागे सुमारे १५ रुपयांची वाढ झाली असून दर आणखी वाढतील. तसेच शहरातील आल्याची आवक विस्कटली आहे. किलोचे दर १०० रुपयांवर गेले आहेत. भाजीपाल्यांचे दर काहीसे वाढले आहेत. वाढलेले लिंबूचे दर कमी झाले आहेत. पालेभाज्यांची आवक रुळावर येत असली तरी दराचा झटका ग्राहकांना बसत आहे. पालेभाज्या एकाच दराच्या पट्टीत येत आहेत; मात्र देशी कोंथिबीरचा भाव अधिक आहे. स्थानिक गाजराची आवक सुरू झाली असून रताळ्याची अपेक्षित आवक अद्याप बाजारात होताना दिसत नाही.
खाद्यतेलांच्या वाढत्या दराची झळ ग्राहकांना बसत आहे. खाद्यतेलांच्या वाढत्या दराचा चढता क्रम असाच राहील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. फळ बाजारात नागपूरची संत्री आता येऊ लागली आहेत. संत्र्यांची आवक बाजारात वाढू लागली आहे. मोर आवळ्याची आवक आणि मागणी चांगली आहे. मोसंबीची आवक घटली आहे. स्थानिक, देशी आणि परदेशी पेरूंची आवक अधिक होत असून शहरात जिथे तिथे पेरू विक्रीस आहेत. फुलांचे दर सध्या आवाक्यात आहेत. तुलसी विवाहानंतर येणाऱ्या लग्नसराईमुळे फुलांना चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे.
- - - - - - - -
प्रति किलो रुपये भाज्यांचे दर : टोमॅटो-२५ ते ३०, दोडका- ६० ते ७०, वांगी- ८० ते १००, कारली-४० ते ५०, ढोबळी मिरची- ५० ते ६०, मिरची-४० ते ५०, फ्लॉवर- ४० ते ५०, कोबी - २५ ते ३०, बटाटा- ३० ते ३५, कांदा - ४० ते ५०, लसूण- ५० ते ६०, आले- ८० ते १००, लिंबू-२५० ते ४०० शेकडा, गाजर- ६० ते ८०, बीन्स- ८० ते १००, भेंडी ५० ते ६०, काकडी- ५० ते ६०, गवार- ८० ते १००, रताळे - ३० ते ४०, दुधी - ३० ते ४०, देशी कोंथिबीर - २५ ते ३०, अन्य पालेभाज्या २० रुपये पेंढी, शेवगा १० ते १५ नग.
- - - - - - - -
खाद्यतेल : सरकी - १५० ते १५५, शेंगतेल -१९० ते १९५, सोयाबीन -१५० ते १५५, पामतेल -१२० ते १२५, सूर्यफूल - १८० ते १८५.
- - --- - - -
फुले ः झेंडू - ६० ते ७०, निशिगंध- ७० ते १००, गुलाब -१५०, गलांडा- ५० ते ६०, शेवंती- ८० ते १००, आष्टर -१५०.
- - - -- - -
फळे : सफरचंद- ८० ते १६०, संत्री -१२० ते १५०, मोसंबी- ८० ते १००, डाळिंब- ८० ते १५०, चिकू- ८० ते १२०, पेरू- ३० ते १००, सीताफळ -८० ते १००, खजूर - १५०-२००, पपई- ३० ते ५०, अननस - ८० ते १००, मोर आवळा - ८० ते १००, केळी- ४० ते ५० डझन, देशी केळी -६० ते ७० डझन, किवी -१०० -१२० (लहान बॉक्स), ड्रॅगन-१०० ते १२०, चिंच- १०० ते १४०, लेची -३५० ते ४००, नासपती- १०० ते १२०.
-- -
कडधान्य : हायब्रीड ज्वारी- २५ ते २८, बार्शी शाळू- ३० ते ५०, गहू- २८ ते ३६, हरभराडाळ - ५९ ते ६१, तूरडाळ- ९८ ते १०३, मूगडाळ- ८५ ते ९०, मसूरडाळ- ८३ ते ८७ , उडीदडाळ- १०० ते १०८, हरभरा- ५० ते ५३, मूग- ८० ते ८७, मटकी- १३० ते १३५, मसूर- ८०, फुटाणाडाळ -७० ते ७२, चवळी- ८०, हिरवा वाटाणा- ६०, छोला - १००.

- - - - - - - - - - - -
चौकट
शेवग्याचा लांबलचक दर
थंडीत शेवग्याला मागणी वाढते; मात्र थंडी सुरू झाली आहे आणि शेवग्याची आवक घटली आहे. वर्षभरात नेहमीच डिमांड असणाऱ्या शेवग्याला यंदाच्या हिवाळ्यातही लांबलचक दर मिळत आहे. प्रति नग शेवग्याला १० ते १५ रुपये मोजावे लागत आहेत.