‘रोटरी’तर्फे मुलींसाठी शिबीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘रोटरी’तर्फे मुलींसाठी शिबीर
‘रोटरी’तर्फे मुलींसाठी शिबीर

‘रोटरी’तर्फे मुलींसाठी शिबीर

sakal_logo
By

04839
‘रोटरी’तर्फे मुलींसाठी शिबीर
इचलकरंजी : रोटरी क्लब येथे माय आत्मनिर्भर बेटी अभियान शिबिराचे उद्‍घाटन झाले. मुलींच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा, त्यांना ऐतिहासिक शस्त्र कलेची ओळख व्हावी म्हणून अकरा दिवशीय शिबिराचे आयोजन रोटरी क्लब आणि माय फाऊंडेशनतर्फे केले. शिबिर रोटरी क्लब, दाते मळा येथे दररोज सायंकाळी ५ ते ७ या वेळेत सुरू आहे. प्रमुख पाहुणे म्हणून सौ. गीता श्रीजा-भुतडा, कृष्णाजी भुतडा यांची प्रमुख उपस्थिती होती. रोटरीचे अध्यक्ष सत्यनारायण धूत, सेक्रेटरी प्रकाश गौड, माय फौंडेशनचे उपाध्यक्ष श्यामसुंदर मर्दा उपस्थित होते. महेश दोंडे व सहकारी यांच्यावतीने दांडपट्टा, तलवार, भाला, लाठीकाठीचे प्रात्यक्षिक सादर केले.
-----------
04838
‘व्यंकटेश’मध्ये इकॉनॉमिक्स असोसिएशन
इचलकरंजी ः शेअर बाजार म्हणजे जुगार नाही. योग्य ती जोखीम स्वीकारून शेअर बाजारामधून नफा मिळवता येतो. उपलब्ध आधुनिक तंत्रज्ञान स्मार्ट फोनच्या माध्यमातून शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणे अगदी सोयीस्कर झाल्याने महाविद्यालयीन जीवनामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींना नफा मिळवण्यासाठी एक उत्पन्नाचा उत्तम स्त्रोत आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापिठातील अर्थशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख प्रोफेसर डॉ. विजय काकडे यांनी केले. व्यंकटेश महाविद्यालयामध्ये इकॉनॉमिक्स असोसिएशनच्या उद्‍घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. प्रोफेसर डॉ. एन. एम. मुजावर यांनी अध्यक्षीय भाषणात शेअर बाजारातील फसवणुकीचे प्रकार, धोके यासंबंधी माहिती दिली. डॉ. डी. एस. कांबळे यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. डॉ. पी. आर. गायकवाड यांनी आभार मानले. सूत्रसंचालन सना मुल्ला हिने केले.
----------------
04837
माध्यमांतर अभ्यास उपक्रम
इचलकरंजी : डीकेएएससी महाविद्यालयात माध्यमांतर अभ्यास उपक्रम झाला. डीकेएएससी कॉलेज आणि श्रीमती आ. रा. पाटील कन्या महाविद्यालय यांच्या मराठी विभागामध्ये झालेल्या अनुबंध करारातंर्गत या माध्यमांतर अभ्यास उपक्रम घेतला. शिवाजी विद्यापिठाच्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमातील साहित्याचे चित्रपटातील माध्यमांतर या अनुषंगाने संतोष फिरींगे यांच्या लघुकथेचे ‘झेल्या’ चित्रपटात झालेले माध्यमांतर प्रत्यक्ष लेखकाच्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळाले. प्रमुख पाहुणे श्री. फिरींगे यांनी विद्यार्थ्यांच्या महत्त्वाकांक्षेस ग्रामीण जीवनातील समजुती, दारिद्र्य अंधश्रद्धांमुळे कशी खीळ बसते याचे विवेचन करणारा ‘झेल्या’ चित्रपट विद्यार्थ्यांना दाखवला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अनिल पाटील होते. नवीन शैक्षणिक धोरण व नॅक पुनर्मूल्यांकनाच्या दृष्टीने अनुभवाधिष्ठित, कौशल्यपूरक ठरणारा आणि अनुबंध कराराला अपेक्षित असा नावीन्यपूर्ण उपक्रम महाविद्यालयात आयोजीत केल्याबद्दल प्राचार्य डॉ. पाटील यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. डी. सी. कांबळे, प्रा. डी. ए. यादव, डॉ. सुनीता वेल्हाळ, ग्रंथपाल विजय यादव, डॉ. अंजली उबाळे, डॉ. प्रियांका कुंभार उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन मराठी विभाग प्रमुख प्रा. संजय सुतार आणि प्रा. डॉ.सुभाष जाधव यांनी केले. प्रास्ताविक डॉ. ज्ञानेश्वर कांबळे यांनी केले. आभार प्रा. प्रतिभा पैलवान यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. भारती कोळेकर यांनी केले.
------------