दुचाकी बडा दंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुचाकी बडा दंड
दुचाकी बडा दंड

दुचाकी बडा दंड

sakal_logo
By

दुचाकीवर तब्बल
१७ हजार ५०० रुपयांचा दंड


इचलकरंजीत परिवहन विभागाची कारवाई

इचलकरंजी, ता. ५ : शहापूर भागात एका ट्रकचा पाठलाग करताना परिवहन विभागाच्या भरारी पथकाने एका दुचाकी वाहनावर कारवाई केली आणि ही कारवाई शहरात चांगलीच चर्चेची ठरली. वाहनचालक आणि मालक या दोघांनाही जबाबदार धरत परिवहन विभागाने तब्बल १७ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला. ही दंडात्मक कारवाई इंडस्ट्रियल इस्टेट भागात आज सकाळच्या सुमारास करण्यात आली.
परिवहन विभागाने दिलेली माहिती अशी- आज सकाळच्या सुमारास शहापूर येथील इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात परिवहन विभागाचे पथक एका ट्रकचालकाचा पाठलाग करत होते. दरम्यान, त्यांनी संशयावरून एका ट्रिपल सीट जाणाऱ्या दुचाकी वाहनाला थांबवले. बेजबाबदारपणे वाहन चालवणाऱ्या या वाहनावर परिवहन विभागाने कारवाई केली. बेजबाबदारपणाचा कळस ठरलेल्या या वाहनचालक व मालक या दोघांवरही दंडात्मक कारवाई केली. विना हेल्मेट, ट्रिपल सीट, विना इन्शुरन्स, विना आरसे अशी विविध कारवाई करत तब्बल १७ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला. वाहनाच्या प्रत्येक कारवाईस वाहनचालक व वाहनमालक या दोघांनाही जबाबदार धरून भला मोठा दंड करण्यात आला आहे. दुचाकी वाहनावर एकाच वेळी झालेल्या या दंडात्मक कारवाईची चर्चा शहरात रंगली होती.