जागरूक नागरीक बनण्यास शिक्षण आवश्यक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जागरूक नागरीक बनण्यास शिक्षण आवश्यक
जागरूक नागरीक बनण्यास शिक्षण आवश्यक

जागरूक नागरीक बनण्यास शिक्षण आवश्यक

sakal_logo
By

04848
इचलकरंजी : व्यंकटेश महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलताना बोलताना चंद्रकांत फडणीस. व्यासपीठावर मान्यवर.
---------
जागरूक नागरिक बनण्यास शिक्षण आवश्यक
चंद्रकांत फडणीस; इचलकरंजीतील व्यंकटेश महाविद्यालयात कार्यक्रम
इचलकरंजी, ता. ६ : शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक आणि आध्यात्मिक हे आपल्या प्रवृत्तीची मुळे घट्ट करण्यासाठीचे पाच स्तर आहेत. अध्यात्म हे अत्यंत महत्त्वाचे असून आपल्या ‘स्व’ची ओळख आपल्याला यापासून होते. यासाठी जागरूक नागरिक बनायचे असेल तर शिक्षण आवश्यक आहे, असे प्रतिपादन अण्णाभाऊ आजरा तालुका शेतकरी सहकारी सूतगिरणीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत फडणीस यांनी केले. ते व्यंकटेश महाविद्यालयामध्ये बी. कॉम. आयटी विभागातर्फे आयोजित ‘न्यू नाईंटी अँड टॉप टेन’ या विषयावर आधारित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
श्री. फडणीस म्हणाले, ‘‘आपण स्वतः एक पुस्तक आहोत. त्यामुळे मुखपृष्ठापासून आतील पाने ही वाचनीय, सुरेख व हवेहवेसे वाटणारे असे पुस्तक स्वतःला बनवले पाहिजे. आपल्या वृत्ती, प्रवृत्ती या छोट्या-छोट्या गोष्टींमधून, सकारात्मक गोष्टींमधून, आनंदी विचारांमधून आपल्या अंतर्मनाला देऊन उत्कृष्ट पद्धतीने बदलता येतात. दररोज सकाळी उठल्यानंतर आपण प्रथम ईश्वराचे आभार मानले पाहिजेत. कलागुण ओळखून ते वाढीस लागावेत, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.’’ अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. व्ही. ए. माने होते. प्रा. डॉ. पी. आर. गायकवाड यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. सेजल बोरा व अमृता रजपूत यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. एस. एम. वंजीरे यांनी आभार मानले.