कचरा उचलण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कचरा उचलण्याची मागणी
कचरा उचलण्याची मागणी

कचरा उचलण्याची मागणी

sakal_logo
By

कचरा उचलण्याची मागणी
इचलकरंजी : शहरातील शिकलगार समाज बाजार कट्टा, जवाहरनगर येथे साचलेला कचरा काढण्याच्या मागणीचे निवेदन बहुजन दलित महासंघाच्यावतीने महानगरपालिकेचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांना दिले. त्वरीत कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची मागणी केली आहे. तालुका अध्यक्ष नागराज हजारे, अमोल शिकलगार, विनायक शिकलगार, आकाश शिकलगार, सागर शिकलगार, तुषार शिकलगार, अभी शिकलगार, अनिकेत शिकलगार, राज शिकलगार, सचिन शिकलगार, शुभम शिकलगार तसेच भागातील नागरिक उपस्थित होते.
----------------------------
व्यायाम साहित्य दुरुस्तीची मागणी
इचलकरंजी : शहरातील भोने माळ येथील धर्मवीर छत्रपती संभाजी उद्यानमध्ये व्यायामासाठी बसवलेली यंत्रसामुग्री नादुरुस्त झाली आहे. त्यामुळे भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे येथील व्यायामासाठी बसवलेले साहित्य तत्काळ दुरुस्त करावे, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे. तीन वर्षांपूर्वी ओपन जिम संकल्पनेतून व्यायामाच्या विविध प्रकारची यंत्रसामग्री बसवली होती. मात्र सहा महिन्यांपासून येथील अनेक यंत्रे नादुरुस्त झाली आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. अनेक मशीनरी पावसात भिजून गंजल्यामुळे आणि त्याआधी सततच्या वापरामुळे निकामी व वापरण्यास निरुपयोगी झाली आहेत. महापालिका प्रशासनाने दखल घेऊन यंत्रसामुग्री दुरुस्त करावी अथवा नवीन यंत्रसामुग्री बसवावीत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.