डॉ. कांबळे यांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. कांबळे यांचा सत्कार
डॉ. कांबळे यांचा सत्कार

डॉ. कांबळे यांचा सत्कार

sakal_logo
By

04867
डॉ. कांबळे यांचा सत्कार
इचलकरंजी : शिवाजी विद्यापीठाच्या कॉमर्स विभागातील व्यवस्थापन विषयाच्या अभ्यास मंडळावर बिनविरोध निवड झाल्याबद्दल डॉ. बी. एन. कांबळे यांचा व्यंकटेश महाविद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. व्ही. ए. माने यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य प्रो. डॉ. एन. एम. मुजावर, प्रा. डॉ. एस. एच. आंबवडे, डॉ. एस. एन. जरंडीकर, शारीरिक शिक्षण संचालक अमीन बाणदार, ग्रंथपाल एम. पी. केसरकर, अधीक्षक अनोश गायकवाड उपस्थित होते.
-------------
सदस्यता नोंदणीस प्रारंभ
इचलकरंजी : विश्व हिंदू परिषद सदस्यता नोंदणी हितचिंतक अभियानास शहरात सुरुवात झाली आहे. २० नोव्हेंबरपर्यंत हे अभियान राबवण्यात येणार आहे. नोंदणी प्रारंभ कार्यक्रमासाठी विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री व अखिल भारतीय सत्संग प्रमुख दादाजी वेदक यांची प्रमुख उपस्थिती होती. शहरातील सोन्या मारुती मंदिरामध्ये शेकडो हिंदू भाविकांच्या उपस्थितीत सत्संगाने या उपक्रमाची सुरुवात झाली. दादाजी वेदक यांनी भजनाची प्रस्तुती केली आणि हिंदू समाजाचे प्रबोधन केले. यावेळी सुजित कांबळे, शिवप्रसाद व्यास, सोमेश्वर वाघमोडे, सौ. रेवती हनमसागर, सौ. अरुणा माने, सौ. रानडे, सौ. संगीता चव्हाण, राहुल बोरा, मुकेश दायमा, बाळासाहेब ओझा, प्रवीण सामंत, मुकुंद उरुणकर, शिवाजी हंडे आदी उपस्थित होते.
-------------
इचलकरंजीतून ५०० कार्यकर्ते सहभागी
इचलकरंजी : भारत जोडो यात्रेत इचलकरंजीतून ५०० कार्यकर्ते हिंगोली येथे सहभागी होणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव शशांक बावचकर यांनी सांगितले. काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी सुरू केलेली भारत जोडो यात्रा तेलंगणा येथून सोमवारी (ता. ७) नांदेड जिल्ह्यात दाखल झाली आहे. ती महाराष्ट्रातील नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला व बुलढाणा या पाच जिल्ह्यांतून मार्गक्रमण करणार आहे. १४ दिवसांमध्ये ३८४ किलोमीटर चालणार आहे. यात्रेमध्ये कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे कार्यकर्ते हिंगोली येथे १२ नोव्हेंबरला सहभागी होणार आहेत. यामध्ये तरुण, महिला व ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. सहभागी कार्यकर्त्यांना भारत जोडो यात्रेचा लोगो असलेला टी-शर्ट व कोल्हापुरी भगवा फेटा देण्यात येणार असून सर्व कार्यकर्ते टी-शर्ट व भगवा फेटा परिधान करून यात्रेत सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रामध्ये भारत जोडो यात्रेला प्रतिसाद मिळत असून कोल्हापूर जिल्ह्यातून आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली दहा हजार कार्यकर्ते हिंगोली येथे सहभागी होणार असल्याची माहिती दिली आहे.