ज्वारी, गव्हाच्या दरात वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्वारी, गव्हाच्या दरात वाढ
ज्वारी, गव्हाच्या दरात वाढ

ज्वारी, गव्हाच्या दरात वाढ

sakal_logo
By

04875

-----------
ज्वारी, गव्हाच्या दरात वाढ
लिंबू स्वस्त; वाळलेल्या कांद्यांना मागणी
इचलकरंजी, ता. १० : नेहमी स्थिर असणाऱ्या धान्य बाजारातील दराने तेजी घेतली आहे. ज्वारी, गव्हाच्या दरात प्रतिकिलो सुमारे ७ ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे बाजारात ग्राहक आता ज्वारी, गहूला महाग झाले आहेत.
शहर व परिसरातून मागणी मोठी असून मात्र आवक घटल्याने दरावर परिणाम झाला आहे. तसेच मूगडाळ, तूरडाळीच्या किमतीत कमालीची वाढ झाली आहे. वाढत्या धान्यांचे दर पुढील तीन महिने असेच राहतील, असा अंदाज धान्य विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे. रब्बी हंगामातील उत्पादनावर धान्याचा दर ठरू शकतो. खाद्यतेलांच्या दरातही चढउतार सुरूच असून याचा परिणाम गृहिणींच्या बजेटवर होत आहे.
बाजार समितीत या आठवड्यात कांद्याची आवक काहीशी वाढली आहे. त्यामुळे दरात घसरण झाली असून ओल्या व वाळलेल्या कांद्याचे दर वेगळे आहेत. वाळलेल्या कांद्यांना मागणी मोठी आहे. कोथिंबीरची आवक चांगलीच सुधारली असून पेंढीचे दर दहा ते पंधरा रुपयांवर आले आहेत. मात्र इतर भाजीपाल्याचे दर वाढतच आहेत. मेथीसह इतर भाजीपाला २० ते २५ च्या घरात आहे. लिंबूचे दरही थंडीमुळे गारठले आहेत. लिंबूच्या प्रति शेकडा दरात ३५ ते ४० टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे बाजारात आता लिंबू स्वस्त आहे.
फळ बाजारात नागपूर संत्रीची आवक जोरदार होऊ लागली आहे. जिथे तिथे मोठ्या प्रमाणात संत्रीची विक्री होताना दिसत आहे. मोसंबीची आवक फारच घटली आहे. कलिंगडला भाव चढला आहे. राजा अननसाची आवक नसून राणी अननसाची मोठ्या प्रमाणात चलती आहे. फुलांचे दर पडले असून लग्नसराईची प्रतीक्षा कायम आहे. थंडीच्या मोसमात निशिगंधाचे उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे निशिगंधाचा भाव टिकून आहे.
- - - - - - - -
प्रति किलो रुपये भाज्यांचे दर : टोमॅटो-२५ ते ३०, दोडका- ६० ते ७०, वांगी- ८० ते १००, कारली- ४० ते ५०, ढोबळी मिरची- ५० ते ६०, मिरची-४० ते ५०, फ्लॉवर-४० ते ५०, कोबी- २५ ते ३०, बटाटा- ३० ते ३५, कांदा - ३० ते ४०, लसूण- ५० ते ६०, आले- ८० ते १००, लिंबू- १५० ते ३०० शेकडा, गाजर-६० ते ८०, बीन्स- ८० ते १००, भेंडी ५० ते ६०, काकडी- ५० ते ६०, गवार- ८० ते १००, रताळे -३० ते ४०, दुधी -३० ते ४०, कोंथिबीर -१० ते १५, अन्य पालेभाज्या २० रुपये पेंढी, शेवगा १० ते १२ नग.
- - - - - - - -
खाद्यतेल : सरकी - १५० ते १५५, शेंगतेल -१९० ते १९५, सोयाबीन -१५० ते १५५, पामतेल -१२० ते १२५, सूर्यफूल - १८० ते १८५.
- - --- - - -
फुले - झेंडू -२०, निशिगंध- ७० ते १००, गुलाब -१५०, गलांडा- ४० ते ५०, शेवंती-२० ते ३०, आष्टर -६० ते ८०.
- - - -- - -
फळे : सफरचंद-८० ते १६०, संत्री - ६० ते १००, मोसंबी-८० ते १००, डाळिंब-८० ते १५०, चिकू-८० ते १२०, पेरू-३० ते १००, सीताफळ -८० ते १००, खजूर - १५० ते २००, पपई- ३० ते ५०, अननस -८० ते १००, मोर आवळा -८० ते १००, केळी- ३० ते ४० डझन, देशी केळी - ५० ते ६० डझन, किवी -१०० ते १२० (लहान बॉक्स), ड्रॅगन- १०० ते १२०, चिंच-१०० ते १४०, लेची -३५० ते ४००.
-- -
कडधान्य : हायब्रीड ज्वारी- ३७ ते ५०, बार्शी शाळू- ४० ते ५०, गहू- ३२ ते ३८, हरभराडाळ -५९ ते ६१, तूरडाळ- १०५ ते ११५, मूगडाळ- ९३ ते ९८, मसूरडाळ- ८३ ते ८७, उडीदडाळ- १०० ते १०८, हरभरा- ५० ते ५३, मूग- ८० ते ८७, मटकी- १३० ते १३५, मसूर- ८०, फुटाणाडाळ -७० ते ७२, चवळी- ८०, हिरवा वाटाणा- ६०, छोला - १००.
- - - - - - - - - - - -
संकरित फळांना पसंती
फळ बाजारात हंगाम नसतानाही अनेक फळे मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. आंबा तर आता वर्षभर विक्रीस आहे. यामध्ये देशातील विविध प्रांतांतून विविध जातीचा आंबा शहरात दाखल होत आहे. तसेच सीताफळही वेगवेगळ्या प्रकारात दिसत आहे. सुरुवातीला संकरित झालेले गोल्डन सीताफळ विक्रीस होते. आता रामफळ, हनुमान फळ यापासून संकरित केलेल्या अनोख्या सीताफळाची जात विक्रीस आहे. या संकरित फळांना फळ बाजारात चांगली पसंती मिळताना दिसते.