भेंडीतून लाखोंचे उत्पन्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भेंडीतून लाखोंचे उत्पन्न
भेंडीतून लाखोंचे उत्पन्न

भेंडीतून लाखोंचे उत्पन्न

sakal_logo
By

04883

----------------
भेंडीतून लाखोंचे उत्पन्न
रांगोळीतील निसर्ग पाटीलचे कृतीशील पाऊल
संतोष कमते : सकाळ वृत्तसेवा
रांगोळी, ता.१० : तरूणाई शेतीत शाश्वतपणे रमताना दिसत आहे. येथील अशाच २१ वर्षाच्या तरूण शेतकऱ्याने भेंडी शेतीतुन लाखोंचे उत्पन्न मिळवले आहे. नव्या दमाने नव्या सुधारित जातीच्या भेंडीचे उत्पादन घेत त्याने संशोधन वृत्ती जोपासली आहे. शेतीतील नव्या बदलासाठी धडपडणाऱ्या २१ वर्षाच्या तरुण शेतकऱ्याचे नाव निसर्ग पाटील आहे.
शेतीपिकातुन मोठे उत्पन्न कधी मिळत नाही. सतत होणारे वातावरणातील बदल, अवेळी पडणारा पाऊस, खतांचे भरमसाठ वाढलेले दर यामुळे शेतकऱ्यांना शेतीमध्ये गुंतवलेले पैसेही परत मिळतात की नाही ही शंका असते. पण योग्य नियोजन, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर शेतीपिकातुन लाखोंचे उत्पादन घेता येते निसर्ग पाटील या तरुण शेतकऱ्याने दाखवुन दिले आहे. रांगोळीतील निसर्ग पाटील यांनी मॅकेनिकल डिप्लोमा केला आहे. परंतु नोकरीमध्ये गुंतून न जाता शेती करण्याचे ठरवले. वडीलोपार्जीत दीड एकर शेती आहे. ते नेहमी ऊस शेती करायचे पण उसाला येणारा खर्च आणि तोडणीसाठी लागणारा वेळ पाहता त्यांच्या लक्षात आले की ऊस शेती आता परवडत नाही. यामुळे त्यांनी भेंडीच्या शेतीची माहीती घेतली. यामधील ४० ते ४५ दिवसात उत्पन्न देणाऱ्या भेंडीची लागवड त्यांना फायद्याची वाटु लागली. त्यामुळे त्यांनी दीड एकरमध्ये भेंडीचे पिक घ्यायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी नामधारी एन एस ८६४ या जातीच्या भेंडी बियाणांची निवड केली.
४९ ते ४५ दिवसांनी भेंडी पुर्णपणे फळास आली. एकरी १५ ते २० टनापर्यंत उत्पन्न मिळाले. दररोज सुमारे ४०० किलो भेंडीची विक्री करत आहेत. व्यापारी थेट त्यांच्या बांधावरुनच ५० किलोप्रमाणे भेंडीचा सौदा करून खरेदी करत आहेत. यातून खर्च वजा जाता ३ ते ४ लाखांचे निव्वळ उत्पन्न मिळाले आहे.
------------
नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला. पारंपारिक शेतीला फाटा देत या भेंडीचे उत्पादन घेतले. संशोधक पद्धतीने शेती केल्याने उत्पन्न भरघोस मिळाले.
-निसर्ग पाटील, युवा शेतकरी