लालसेना बांधकाम कामगार संघटनेतर्फे निदर्शने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लालसेना बांधकाम कामगार संघटनेतर्फे निदर्शने
लालसेना बांधकाम कामगार संघटनेतर्फे निदर्शने

लालसेना बांधकाम कामगार संघटनेतर्फे निदर्शने

sakal_logo
By

04890

---------------
लालसेना बांधकाम कामगार संघटनेतर्फे निदर्शने

इचलकरंजी, ता. ११ : बांधकाम कामगारांच्या मागण्याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ लालसेना बांधकाम कामगार संघटनेने आंदोलन केले. आज सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने केली.
कामगारांच्या अर्जांचा त्वरीत निपटारा करावा यासह विविध प्रलंबित मागण्यांबाबत त्वरीत निर्णय न झाल्यास कार्यालयाला घेराओ घालण्याचा इशाराही दिला. कार्यालयातील कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली. इचलकरंजीतील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात कामगारांची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. दलालामार्फत आलेल्या अर्जाची वेळेवर निर्गत केली जाते. या कार्यालयातील मनमानी कामकाजाचाही कामगारांना त्रास होत आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता केवळ आश्‍वासन दिले जाते. या पार्श्‍वभूमीवर लालसेना बांधकाम कामगार संघटनेने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने केली. कामगारांच्या प्रलंबित अर्जांची त्वरीत निर्गत करावी, बांधकाम कामगारांना साडेसात हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे, मृताच्या वारसांना पेन्शन योजनेचा लाभ द्यावा यासह विविध मागण्या केल्या. प्रलंबित मागण्यांबाबत त्वरीत निर्णय न झाल्यास कार्यालयाला घेराओ घालण्याचा इशारा दिला. आंदोलनात हणमंत लोहार, विष्णु चव्हाण, दादासो जगदाळे, महेश लोहार, अमर हिरुकडे, जावेद मुजावर, मंगल तावरे सहभागी झाले होते.