शॉक लागुन मृत्यु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शॉक लागुन मृत्यु
शॉक लागुन मृत्यु

शॉक लागुन मृत्यु

sakal_logo
By

विजेच्या धक्क्याने
गवंड्याचा जागीच मृत्यू

इचलकरंजीतील बाळनगर भागातील घटना

इचलकरंजी, ता. १९ : हायहोल्टेज तारांचा शॉक लागून एका गवंड्याचा जागीच मृत्यू झाला. युवराज महादेव कोळकर (वय ४०, रा. शहापूर) असे त्यांचे नाव आहे. बांधकामाचे प्लास्टर करत असताना लागूनच असलेल्या ११ हजार हाय होल्टेज तारांना स्पर्श होऊन त्यांना शॉक लागला आणि तीस फूट उंचीवरून खाली पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास येथील षटकोन चौकनजीक बाळनगर भागात घडली आहे. घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, येथील बाळनगरमध्ये विपुल महाडिक यांच्या इमारतीच्या बांधकामाचे प्लास्टर करण्याचे काम सुरू होते. दुपारच्या सुमारास युवराज कोळकर हे प्लास्टर करत असताना त्यांचा विद्युत खांबाच्या हाय होल्ट तारांना स्पर्श झाला. या शॉकच्या झटक्याने ते तीस फूट उंचीवरून जमिनीवर कोसळले. याबाबत नागरिकांनी शिवाजीनगर पोलिस आणि महावितरण कंपनीला माहिती दिली. घटनास्थळी धाव घेत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने भागातील वीज पुरवठा खंडित केला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी पाठवला. आयजीएमच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वर्दीनुसार कोळकर यांचा शॉक लागून मृत्यू झाल्याची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे.