सीसीटीव्ही बंदमुळे चोरटे निर्धास्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीसीटीव्ही बंदमुळे चोरटे निर्धास्त
सीसीटीव्ही बंदमुळे चोरटे निर्धास्त

सीसीटीव्ही बंदमुळे चोरटे निर्धास्त

sakal_logo
By

संग्रहित सीसीटीव्ही

सीसीटीव्ही बंद; सुरक्षा ऐरणीवर
---
इचलकरंजीत वर्षभरात घरफोड्यांमध्ये ५० टक्के वाढ
ऋषीकेश राऊत : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २० : कोट्यवधी रुपये खर्च करून सुरक्षेसाठी लावलेली सीसीटीव्ही यंत्रणा बंदच असून, वर्षभरात चोरट्यांनी घरे फोडून कोट्यवधींचा मुद्देमाल लांबविला आहे. शहरात तिन्ही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सीसीटीव्ही बंद असल्याने चोरटे निर्धास्त होत आहेत.
गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षात सुमारे ५० टक्क्यांनी घरफोड्या वाढल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. वर्षभर सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्याने पोलिस अधिकारीही हतबल झाले आहेत. इचलकरंजी शहरात सेफसिटी योजनेतून पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे पसरले. यामुळे विविध ठिकाणच्या हालचालींवर लक्ष ठेवत अनेक गुन्ह्यांचा छडा लागला. गुन्हेगारीवर वचक निर्माण झाल्याने नागरिकही सुरक्षित झाले. मात्र, वर्षभर सीसीटीव्ही यंत्रणा बंद आहे. हाताच्या बोटांवर मोजण्याइतके सीसीटीव्ही कॅमरे सुरू आहेत.
प्रमुख चौक, मार्ग, संवेनशील ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने गुन्ह्यांची उकल करताना पोलिसांना अडचण येत आहे. पोलिसही हतबल होत असून, शहरात चोरी, मोबाईल लंपास, रोकड पळविण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. घरफोड्यांचीही वाढलेली आकडेवारी चिंताजनक आहे. गतवर्षी आजअखेर शहरातील तिन्ही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या घरफोड्यांची संख्या ही यंदा केवळ एका पोलिस ठाण्याची आहे. सीसीटीव्ही बंद असल्याने चोरटे निर्धास्त, तर शहरातील नागरिक भयभीत झाले आहेत. सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यासाठी पहिल्या टप्प्यात एक कोटी ३३ लाख; तर दुसऱ्या टप्प्यात एक कोटी ६० लाख तीन हजार ५०५ रुपये खर्च करण्यात आले. मात्र, एवढा खर्च करूनही वर्षापासून ही यंत्रणा बंद आहे. तसेच, तिसऱ्या टप्प्यात तब्बल २२ कोटी २६ लाख आठ हजार ७९७ रुपयांची रक्कम प्रलंबित आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करता शहर सुरक्षित ठेवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
- - - - - - -

कॅमेऱ्यांची सद्यस्थिती
कॅमेरे* एकूण * सुरू * बंद
सीसीटीव्ही*३५१*२६*३२५
पीटीझेड* २८ * १ *२७
----------------
तुलनात्मक घरफोड्या (आजअखेर)
वर्ष * घरफोड्या
२०२१* २५
२०२२ * ४९
वाढ * २४
टक्केवारी * ४८.९७
------------
वर्षातील घरफोड्या (ग्राफ करणे)
पोलिस ठाणे* घरफोड्या
इचलकरंजी * ८
शिवाजीनगर* १७
शहापूर* २४