तिघांवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तिघांवर गुन्हा
तिघांवर गुन्हा

तिघांवर गुन्हा

sakal_logo
By

मृत्यूला जबाबदार धरत
तिघांवर गुन्हा दाखल
इचलकरंजी : गवंडी काम करणारे युवराज कोळकर (वय ४०) यांच्या मृत्यूला जबाबदार धरत शिवाजीनगर पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. सतीश कवडे, कंत्राटदार भीमान्ना सामान्ना वडर आणि घरमालक विपुल प्रल्हाद महाडिक अशी त्यांची नावे आहेत. येथील बाळनगरमध्ये बांधकामाच्या ठिकाणी धक्का बसून कोळकर यांचा शनिवारी (ता. १९) दुपारी मृत्यू झाला.
मृत कोळकर हे सतीश कवडे आणि कंत्राटदार भीमान्ना वडर यांच्या देखरेखीखाली गिलावा काम करीत होते. हे काम करताना कोळकर यांच्या डोक्याचा ‘महावितरण’च्या वीजवाहिनीस स्पर्श होऊन धक्का बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूस जबाबदार धरत कवडे, वडर आणि महाडिक यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची फिर्याद मोहन कोळकर (वय २६, रा. करंजाळ, जि. बेळगाव) यांनी पोलिसांत दिली.