कोथिंबीर बाजारादिवशी स्वस्त इतरवेळी महाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोथिंबीर बाजारादिवशी स्वस्त इतरवेळी महाग
कोथिंबीर बाजारादिवशी स्वस्त इतरवेळी महाग

कोथिंबीर बाजारादिवशी स्वस्त इतरवेळी महाग

sakal_logo
By

04989
इचलकरंजी : मार्गशीर्ष गुरुवारमुळे बहरलेल्या बाजारात फळे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी राहिली.
------------------
कोथिंबीर बाजारादिवशी स्वस्त; इतर वेळी महाग
मार्गशीर्ष गुरुवारमुळे इचलकरंजीत ठिकठिकाणी बाजार; फळा-फुलांना बूस्टर
इचलकरंजी, ता. २४ : बाजारात कोथिंबीरची आवक रुळावर येत असताना अचानक पुन्हा ती विस्कटत आहे. आठवडा बाजारादिवशी स्वस्त असणारी कोथिंबीर अन्य दिवशी महाग असते.
कांदा, बटाट्याचे दर हळूहळू वाढत आहेत. अद्यापही ठेवणीचा कांदा बाजारात कमी प्रमाणात दाखल होत आहे. सध्या थंडीचा कडाका वाढत असून भाजीपाल्याने बाजार ताजातवाना झाल्याचे पाहायला मिळत आहे. मार्गशीर्ष महिन्यातील आज पहिलाच गुरुवार असल्याने बाजार फुलून गेला होता. मार्गशीर्ष गुरुवारमुळे ठिकठिकाणी बाजार भरल्याचे दिसून आले. फळे, फुलांनी बाजार बहरून गेला. शांत असलेल्या फळ आणि फुल बाजाराला पुढील महिनाभर बूस्टर मिळाला आहे. मार्गशीर्षमुळे फुलांना मागणी वाढल्याने दर वाढेल अशी शक्यता होती; मात्र फुलांना अपेक्षित दर मिळाला नाही. फळ बाजारात आता ॲपल बोरांसह अंजीरचीही आवक वाढत आहे. सध्या विविध प्रजातीच्या पेरूंची सर्वाधिक चलती आहे. खाद्यतेलाचे भाव स्थिर असून कमी होण्यास तयार नाहीत.
- - - - - -
प्रति किलो रुपये भाजीपाला : टोमॅटो-१० ते १५, दोडका- ५० ते ६०, वांगी-५० ते ६०, कारली-४० ते ५०, ढोबळी मिरची- ५० ते ६०, मिरची-४० ते ५०, फ्लॉवर-४० ते ५०, कोबी-२५ ते ३०, बटाटा- ३० ते ३५, कांदा - ३० ते ४०, लसूण- ५० ते ६०, आले- ८० ते १००, लिंबू- १५० ते ४०० शेकडा, गाजर-६० ते ८०, बीन्स- ८० ते १००, भेंडी - ५० ते ६०, काकडी - ५० ते ६०, गवार - ८० ते १००, रताळे - ३० ते ४०, दुधी - ३० ते ४०, कोंथिबीर - १५ ते २०, सोलाना- ५ ते १०, अन्य पालेभाज्या २० ते २५ रुपये पेंढी, शेवगा १५ नग.
- - - - - - - -
खाद्यतेल : सरकी -१५० ते १५५, शेंगतेल -१९० ते १९५, सोयाबीन -१५० ते १५५, पामतेल -१२० ते १२५, सूर्यफूल - १८० ते १८५.
- - --- - - -
फुले - झेंडू -३० ते ४०, निशिगंध- १०० ते १२०, गुलाब -२०० ते २२०, गलांडा- ४० ते ५०, शेवंती- २० ते ३०, आष्टर - ३०-४०.
- - - -- - -
फळे : सफरचंद-८० ते १६०, संत्री -६० ते १००, मोसंबी-८० ते १००, डाळिंब-८० ते १५०, चिकू-८० ते १२०, पेरू-३० ते १००, सीताफळ -८० ते १००, खजूर - १५०-२००, पपई- ३० ते ५०, अननस -८० ते १००, मोर आवळा -८० ते १००, केळी- ३० ते ४० डझन, देशी केळी - ५० ते ६० डझन, किवी -२००-२२० (लहान बॉक्स), ड्रॅगन- २००, चिंच-१०० ते १४०, लेची -३५० ते ४००.
-- -
कडधान्य : हायब्रीड ज्वारी- ३७ ते ५०, बार्शी शाळू- ४० ते ५०, गहू- ३२ ते ३८, हरभराडाळ - ५९ ते ६१, तूरडाळ- १०५ ते ११०, मूगडाळ- ९३ ते ९८, मसूरडाळ- ८३ ते ८७, उडीदडाळ- १०० ते १०८, हरभरा- ५० ते ५३, मूग- ८० ते ८७, मटकी- १३० ते १३५, मसूर- ८०, फुटाणाडाळ -७० ते ७२, चवळी- ८०, हिरवा वाटाणा-६०, छोला - १००.
- - - - - - - - - - - -
बाजारात फुलेच फुले
मार्गशीर्ष महिना सुरू झाला की, फुले भाव खातात; मात्र यंदा पहिल्याच गुरुवारी फुलांनी भाव कमी खाल्ला. बाजारात मोठ्या प्रमाणात झेंडूसह विविध प्रकारच्या फुलांची आवक झाली आहे. सौदे बाजारातच मोठी आवक झाल्याने दरावर परिणाम झाला. त्यामुळे किरकोळ बाजारातही दर आटोक्यात राहिले. उत्पादन वाढल्याने मोठ्या शहरात, परराज्यात जाणारी विशेष करून झेंडूची फुले स्थानिक बाजारात अडकून राहिली.