आंदोलन गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंदोलन गुन्हा
आंदोलन गुन्हा

आंदोलन गुन्हा

sakal_logo
By

आंदोलन करणारे सातजण ताब्यात
इचलकरंजी :दोन दिवसांपासून डिकेटीई शिक्षण संस्थेच्या स्वायत्त महाविद्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मुलासह सात जणांना गावभाग पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलन करून शांततेचा भंग केल्याप्रकरणी प्रतिबंधक कारवाई करून अखेर पोलिसांनी त्यांना रात्री सोडून दिले. सौरभ राजू शेट्टी ( वय 23 रा.शिरोळ),आण्णा विष्णू सुतार (वय २४ रा. चिपरी ता. शिरोळ), प्रतिक कल्लाप्पा धड्डे (वय २५), विर अशोक खूळ (वय १९ दोघे रा.रुई ता. हातकणंगले), विकास इराप्पा चौगुले (वय 38) हेमंत महावीर वनकुंद्रे(वय ४२), सतीश नसू मगदूम (वय ५० तिघे रा. इचलकरंजी) अशी त्यांची नावे आहेत.