पोलिस वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस वृत्त
पोलिस वृत्त

पोलिस वृत्त

sakal_logo
By

भांडणात दोघे जखमी
इचलकरंजी : खोतवाडी (ता. हातकणंगले) येथे झालेल्या भांडणात कोयता लागल्याने दोघे जखमी झाले. गणेश खांडेकर व मंगेश खांडेकर (दोघे रा. तारदाळ) अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणी अरबाज मुल्ला (रा. खोतवाडी) याच्यावर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना आज सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. खोतवाडी येथे गणेश यांचा चुलत भाऊ मंगेश व अरबाज मुला यांचे भांडण सुरू होते. त्यांच्यातील वाद मिटवण्यासाठी गणेश आले. यावेळी अचानक अरबाज याने कोयता मंगेश याला मारण्यासाठी बाहेर काढला. त्वरित कोयता झटापटीत काढून घेत असताना गणेश यांच्या उजव्या हातास व डाव्या हाताच्या बोटाला कोयता लागला. तसेच त्यांचा चुलत भाऊ मंगशे याच्या डोक्याला कोयत्याची मागील बाजू लागली.
---------
बांधकामाचे साहित्य चोरीस
इचलकरंजी : खोतवाडी येथे उघड्या घरातून बांधकामाचे साहित्य चोरीला गेले. खिडकीतून प्रवेश करून सुमारे ९ हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला.खोतवाडी येथे विभूते कुटुंबीयांनी घरात कामगारांचे साहित्य ठेवले होते. चोरट्याने गुरुवारी (ता. २४) रात्री खिडकीतून प्रवेश करून घरातील कटिंग मशीन, ड्रिल मशीन, हॅमर मशीन, ग्राइंडर मशीन, रंदा, स्क्रू ड्रायव्हर, हातोडी असे साहित्य चोरून नेले आहे.