थंडीने भाजी बाजारात स्वस्ताई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

थंडीने भाजी बाजारात स्वस्ताई
थंडीने भाजी बाजारात स्वस्ताई

थंडीने भाजी बाजारात स्वस्ताई

sakal_logo
By

05050
इचलकरंजी : १)पालेभाज्यांची आवक वाढली आहे.
05049
२) चिमुकल्या आंबट गोड चमेली बोरांना ग्राहकांची पसंती मिळत आहे.
---------------
थंडीने भाजी बाजारात स्वस्ताई
दर पंधरा ते वीस रुपयांनी उतरले; चमेली बोरांना ग्राहकांची पसंती
इचलकरंजी, ता. १ : गारठा वाढल्याने भाजीपाला बाजारात स्वस्ताई निर्माण झाली आहे. पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात होत असून दर उतरत आहेत. याबरोबर फळभाज्यांचे भावही प्रतिकिलो पंधरा ते वीस रुपयांनी कमी झाले आहेत.
वाढती थंडी भाज्यांना अनुकूल ठरत असल्याने स्थानिक आवक बाजारात जादा होत आहेत. सौदे बाजारात भाव कमी मिळत असल्याने किरकोळ बाजारातही त्याच प्रमाणात मिळत आहे. शहरात ठिकठिकाणी भाज्यांचे हातगाडे फिरताना दिसत असून दर आणखी उतरणार आहेत. करडी, चाकवतीची भाजीही दिसत आहे. अन्य भाज्यांच्या तुलनेत कोथिंबीर थोडीशी वाढून आहे. फळभाज्याचे दर कमी होत आहेत. टोमॅटोचे दर फार उतरले आहेत. मलकापूरच्या रताळ्याची आवक थांबली असून बेळगावी रताळ्याची आवक अधिक होत आहे. फळबाजारात संत्रीची चलती असून ॲपल बोरांची आवक वाढतच आहे. छोट्या चिमुकल्या आंबट गोड चमेली बोरांना ग्राहकांची पसंती मिळत आहे. ऐन हंगामात फुलांचा भाव पूर्णतः गळून पडला आहे. ऐटीत असणाऱ्या निशिगंधालाही कवडीमोल भाव मिळत आहे. धान्यबाजारात वाढलेले ज्वारी, डाळींच्या किंमती कमी होत आहेत.
- - - - - -
प्रतिकिलो रुपये भाजीपाला : टोमॅटो-१० ते १५, दोडका- ४०ते ५०, वांगी-३०ते ४०, कारली-३०ते ४०, ढोबळी मिरची- ३०ते ४०, मिरची- ३०ते ४०, फ्लॉवर- ३०ते ४०, कोबी-२०ते २५, बटाटा- ३० ते ३५, कांदा - ३० ते ४०, लसूण- ४० ते ५०, आले- ६० ते ८०, लिंबू- १५० ते २५० शेकडा, गाजर -५० ते ६०, बीन्स- ४० ते ५०, भेंडी-४० ते ५०, काकडी- ४० ते ६०, गवार- ८० ते १००, रताळे -३० ते ४०, दुधी -३० ते ४०, कोंथिबीर -१० ते १२, अन्य पालेभाज्या ५ ते १० रुपये पेंढी, शेवगा १५ नग.
- - - - - - - -
खाद्यतेल : सरकी -१५० ते १५५, शेंगतेल -१९० ते १९५, सोयाबीन - १५० ते १५५, पामतेल -१२० ते १२५, सूर्यफूल - १८० ते १८५.
- - --- - - -
फुले - झेंडू -२०ते ३०, निशिगंध- १० ते २०, गुलाब -२५० ते ३००, गलांडा- ३०ते ४०, शेवंती- २० ते ३०, आष्टर - २० ते ३०.
- - - -- - -
फळे : सफरचंद- ८० ते १६०, संत्री - ६० ते १००, मोसंबी- ८० ते १००, डाळिंब- ८० ते १५०, चिकू- ८० ते १२०, पेरु- ३० ते १००, सीताफळ - ८० ते १००, खजूर - १५० ते २००, पपई- ३० ते ५०, अननस - ८० ते १००, मोर आवळा - ८० ते १००, केळी- ३० ते ४० डझन, देशी केळी -५० ते ६० डझन, किवी - २०० ते २२० ( लहान बॉक्स), ड्रॅगन- २००, चिंच-१०० ते १४०, लेची - ३५० ते ४००.
-- -
कडधान्य : हायब्रीड ज्वारी- ३३ ते ४८, बार्शी शाळू- ४०ते ५०, गहू- ३२ ते ३८, हरभराडाळ -५९ ते ६१, तुरडाळ- १०३ ते १०५, मुगडाळ- ९३ ते ९८, मसूरडाळ- ८३ ते ८७ , उडीदडाळ- १०० ते १०८, हरभरा- ५० ते ५३, मूग- ८० ते ८७, मटकी- १३० ते १३५, मसुर- ८०, फुटाणाडाळ -७० ते ७२, चवळी- ८०, हिरवा वाटाणा- ६०, छोला - १००.
- - - - - - - - - - - -
पॉलिहाऊस भाज्यांना रामराम
दोन महिन्यांपासून भाज्यांना अधिक भाव चढला होता. या कालावधीत स्थानिक भागातील भाज्यांचे उत्पादन थांबले होते. कर्नाटकातून पॉलिहाऊसमधील भाज्या सर्वाधिक बाजारात येत होत्या. आता उत्पादन वाढल्याने दर्जेदार भाज्या दाखल होत आहे. त्यामुळे पॉलिहाऊस भाज्यांना पसंती मिळताना दिसत नाही.
---