
पोलिस महासंचालकांची इचलकरंजीला भेट
05061
इचलकरंजी : पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्याला भेट देवून परेडचीही पाहणी केली.
--------
पोलिस महासंचालकांची इचलकरंजीला भेट
इचलकरंजी, ता.२: पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांनी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी इचलकरंजी शहराला भेट दिली. त्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाणे यासह अन्य शाखांच्या कामकाजाची माहिती घेत आढावा घेतला. तसेच कलानगर येथील अंतिम टप्प्यातील पोलिस सदनिकांच्या सुरू असणाऱ्या बांधकामाची पाहणी केली. दरम्यान शिवाजीनगर पोलिस ठाण्यात महासंचालकांच्या उपस्थितीत शहरातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांची बैठक झाली.
श्री. शेठ दोन दिवसांच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पहिल्या दिवशी वार्षिक निरीक्षणाचा भाग म्हणून कोल्हापूर पोलिस दलाची वार्षिक तपासणी केली. त्यांनतर आज दुसऱ्या दिवशी ते इचलकरंजी शहरात आले. तपासणीचा भाग म्हणून त्यांनी दुपारी शिवाजीनगर पोलिस ठाण्याची पाहणी केली. शिवाजीनगरचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी त्यांचे स्वागत केले. पोलिस महासंचालकांनी पोलिस ठाण्यात जावून कामकाजाची आणि परेडचीही पाहणी केली. पोलिस ठाण्याच्या वेगवेगळ्या उपक्रमांसह गुन्ह्यांची माहिती घेत अधिकाऱ्यांना मार्गदर्शनही केले. पोलिस ठाण्यातील सर्व विभागांना भेटी दिल्या. त्यानंतर आयोजित बैठकीत शहरातील सर्व पोलिस ठाण्याचा प्रभारी अधिकाऱ्यांकडून गुन्ह्यांचा आढावा घेतला.
कलानगर येथे पोलिसांच्या सदनिका बांधकामाचे काम सुरू आहे. या कामाच्या ठिकाणी पोलीस महासंचालकांनी प्रत्यक्ष भेट दिली. नियोजित प्रकल्पाची माहिती जाणून घेत सूचना केल्या. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, गडहिंग्लज विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, पोलिस उपअधीक्षक रामेश्वर वैजने, गावभागचे पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार, पोलिस निरीक्षक श्री. वाघमोडे, शहापूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजीत पाटील, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास अडसूळ आदी उपस्थित होते.