पोक्सो गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोक्सो गुन्हा
पोक्सो गुन्हा

पोक्सो गुन्हा

sakal_logo
By

पोक्सोअंतर्गत तरुणावर गुन्हा दाखल

इचलकरंजी, ता. ४ : महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका तरुणावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. संशयित अभिषेक दिलीप साळुंखे (रा. शाहूनगर, चंदूर) असे त्याचे नाव आहे. हे प्रकरण मिटवण्यासाठी पीडित मुलीचे वडील, काका यांसह तिघांना मारहाण झाल्याची घटना घडली. याप्रकरणी हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती महेश बसगोंडा पाटील, दिलीप साळुंखे, अभिषेक साळुंखे, आर्यन साळुंखे (सर्व रा. चंदूर) यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची तक्रार पीडित मुलीच्या आईने गावभाग पोलिसांत दिली आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी यांच्या भाच्याचा संशयित अभिषेक साळुंखे हा मित्र आहे. पीडित मुलगी ही शनिवारी (ता. ४) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास महाविद्यालयातून बाहेर पडताना प्रवेशद्वारावर संशयित अभिषेक हा धूमस्टाईल दुचाकीवरून आला. या वेळी पीडित मुलीचा हात धरून मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे सांगत प्रेमसंबंध ठेवण्याची जबरदस्ती केली. दरम्यान, पीडित मुलीचे वडील, चुलते यांसह तिघांना महेश पाटील यांनी प्रियदर्शनी पतसंस्थेच्या कार्यालयात बोलावून घेतले. या वेळी महेश पाटील यांच्यासह पाच जणांनी भेटण्यासाठी आलेल्या पीडित मुलीचे वडील, चुलते यांसह तिघांना मारहाण केली.