अपघात जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपघात जखमी
अपघात जखमी

अपघात जखमी

sakal_logo
By

ट्रॉलीच्या चाकात अडकून दुचाकीस्वार जखमी

इचलकरंजी : खोतवाडी (ता. हातकणंगले) येथील सांगली रोडवर उसाने भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या मागील चाकात अडकून दुचाकीस्वार दहा फूट फरफटत गेला. ट्रॅक्टरचे चाक अंगावरून गेल्याने वाहन चालक गंभीर जखमी झाला आहे. राम कुंडलिक वाघमारे (वय ४०, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, सांगली) असे त्याचे नाव आहे. उसाने भरलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून ओव्हरटेक करत असताना दुचाकी चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. ही घटना आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारस हॉटेल गुरुप्रसादसमोर घडली. या घटनेमुळे सुमारे एक तास रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. जखमीला त्वरित सांगली सिव्हील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबतची नोंद रात्री उशिरापर्यंत शहापूर पोलिस ठाण्यात झाली नव्हती.