बंद पडलेले ४० टक्के कॅमेरे सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बंद पडलेले ४० टक्के कॅमेरे सुरू
बंद पडलेले ४० टक्के कॅमेरे सुरू

बंद पडलेले ४० टक्के कॅमेरे सुरू

sakal_logo
By

05146
लोगो ः बातमीचा परीणाम
----------
बंद पडलेले ४० टक्के कॅमेरे सुरू
पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे; इचलकरंजीत नियंत्रणासाठी दोन कक्ष
इचलकरंजी, ता.१३ : पोलिस दलाच्या निधीतून शहरातील बंद पडलेल्यांपैकी ४० टक्के सीसीटीव्ही कॅमेरे सुरू केले आहेत. निधीची कमतरता असल्याने उर्वरीत कॅमेरे या महिन्याअखेर सुरू करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवला आहे. मंजूर असलेले तिसऱ्‍या टप्प्यातीलही काम लवकरच सुरू होणार आहे. यामुळे शहरातील तिन्ही पोलिस ठाण्याच्या वाढीव भागातही सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार असून याच्या नियंत्रणासाठी शहरात दोन स्वतंत्र कक्ष उभारण्यात येतील, अशी माहिती पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.
येथील अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलिस अधिकाऱ्यांच्या आयोजीत बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. श्री. बलकवडे म्हणाले, ‘कोल्हापूर शहराच्या तुलनेत इचलकरंजी पोलिस दलात मनुष्यबळ फार कमी आहे. पोलिस विभागाच्या विविध पथकात, विभागात कर्मचारी काम करत असल्याने प्रत्यक्ष पोलिस ठाण्यात कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. या वर्षात पोलिस ठाण्यात प्रत्येक तक्रारीची नोंद घेतली जात आहेत. त्यामुळे चोऱ्या, घरफोड्यांची संख्या वाढत आहे. येत्या काळात मनुष्यबळ वाढवण्यासाठी पोलिस महासंचालकांकडे मागणी केली आहे. पुढील सहा महिन्यापर्यंत सीसीटिव्ही कार्यान्वित राहील, इतका शिल्लक निधी खर्च केला आहे."
उर्वरीत सीसीटिव्ही कॅमेरे सुरू करण्यासह ही यंत्रणा कायमस्वरूपी कार्यान्वित ठेवण्यासाठी पोलिस आयुक्त कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवला आहे. मंजूर तिसऱ्या टप्प्यातील २६२ सीसीटिव्हीचे काम लवकरच सुरू होणार आहे. यामध्ये शिवाजीनगर, शहापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाढीव भागाचा समावेश आहे. यामुळे मनुष्यबळाअभावी बंद असणाऱ्या पोलिस चौक्यांना बळ मिळणार आहे. या भागातील वाढत्या गुन्हेगारीवर लक्ष ठेवण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
------
एलसीबी सुरू करणार नाही
वाढती गुन्हेगारी लक्षात घेता गुन्ह्यांची उकल करण्यासाठी इचलकरंजीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण कार्यालय सुरू केले. मात्र काही महिन्यांपूर्वी हे कार्यालय बंद केले. केवळ जिल्ह्यात पोलिस अधीक्षक कार्यालय अंतर्गत एकच गुन्हे अन्वेषण कार्यालय सुरू राहणार आहे. येत्या काळात इचलकरंजीत गुन्हे अन्वेषण कार्यालय सुरू केले जाणार नसल्याचे बलकवडे यांनी स्पष्ट केले.