कब्बडी कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कब्बडी कारवाई
कब्बडी कारवाई

कब्बडी कारवाई

sakal_logo
By

शिरोलीच्या छावा संघावर २ वर्षे बंदी
जिल्हा कबड्डी असोसिशनची कारवाई; तीन खेळाडूंवरही बडगा

इचलकरंजी, ता.१३ : जांभळी (ता. शिरोळ) येथे जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात झालेली हाणामारी प्रतिस्पर्धी संघांना चांगलीच भोवली आहे. छावा शिरोली संघासह तीन खेळाडूंवर कब्बडी खेळण्यासाठी बंदी घालत कडक कारवाई केली. याबाबत जिल्हा कबड्डी असोसिशनचे उपाध्यक्ष दत्तात्रय खराडे यांच्या अध्यक्षस्थानी झालेल्या समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गेल्या 55 वर्षातील संघासंह खेळाडूंवर झालेली ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.
छावा शिरोली संघाला 2 वर्षे आणि याच संघातील प्रो कबड्डी खेळाडु ऋतुराज कोरवी, निलेश कांबळे या खेळाडुंना महाराष्ट्रात ३ वर्षे कुठेही खेळता येणार नाही. तसेच शाहु सडोली संघाच्या शरद पवार याच्यावर २ वर्षे बंदी घातली आहे. कोल्हापूर असोसिएशनने कारवाईची प्रत महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनकडे पाठवली आहे.
शाहु सडोली आणि छावा शिरोलीतील अंतिम सामन्यावेळी खेळाडूंचा अभूतपूर्व गोंधळ आणि हुल्लडबाजी झाली. यामुळे हा सामना रद्द केला. याची कबड्डी जिल्हा असोसिएशनने गंभीर दखल घेत तातडीची बैठक बोलावली. छावा संघाला 2 वर्षे खेळाण्यासाठी बंदी घातली.
शहापूर येथील कुमार गट स्पर्धेत झालेल्या सामन्यात पंचांना शिवीगाळ केल्याप्रकरणी शाहू सडोली संघाच्या शरद पवार याच्यावरही 2 वर्षे बंदी घातली आहे. बैठकीस असोसिएशनचे कार्यवाह संभाजी पाटील, रमेश भेंडगिरी, शिवाजीराव चोरगे, भगवान पवार, अजित पाटील, विलास खानविलकर, उदय चव्हाण, प्रा. शेखर शहा, बाबासाहेब उलपे उपस्थित होते.

कोट
छावा संघावर बंदी घालण्यात आली असल्याबाबत असोसिएशनकडून अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. अधिकृत माहिती मिळाल्यानंतर त्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
-नामदेव गावडे, प्रशिक्षक, छावा