दागिने घेवून पसार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दागिने घेवून पसार
दागिने घेवून पसार

दागिने घेवून पसार

sakal_logo
By

11 तोळे सोने घेऊन
पश्चिम बंगालचा
कारागिर पळाला

इचलकरंजी, ता.१४ : सुमारे 11 तोळे सोने घेऊन शहरातून पश्चिम बंगालच्या कारागिराने पलायन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. साडेपाच लाखाच अपहार केल्याप्रकरणी गावभाग पोलिस ठाण्यात एकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अस्गर अफ्सर अली (रा. हरीत, पुइनान, जि. हुगळी, राज्य पश्चिम बंगाल) असे त्याचे नाव आहे. येथील गांधी कॅम्प परिसरात त्याच्याकडे सोन्याचे गंठण तयार करण्यासाठी हे दागिने त्याला दिले होते.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, येथील गांधी कॅम्प परिसरात नातेवाईकांच्या घरी फिर्यादी आणि सोन्या-चांदीचे दागिने बनवणारा कारागिरी यांची ओळख झाली होती. या ओळखीतून कारागिराने विश्‍वास संपादन करून फिर्यादीकडून सोन्याचे 2 गंठन बनवण्यासाठी 11 तोळे सोने घेतले होते. परंतु, कारागिराने ते सोन्याचे दागिने बनवून न देता सोने घेऊन पलायन केले. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन अस्गर अली या कारागिरावर गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे .