
आत्महत्या
फोटो- राजेंद्र आढाव
....
आजाराला कंटाळून एकाची
इचलकरंजीत आत्महत्या
इचलकरंजी : आजाराला कंटाळून महिनाभरापासून बेपत्ता झालेल्या एकाचा मृतदेह गुरुवारी (ता. २२) मिळून आला. राजेंद्र ज्ञानदेव आढाव (वय ४६, रा. गुरुकन्नननगर) असे त्यांचे नाव आहे. जुना चंदूर रोडवरील शेतात ऊस तोडणी सुरू असताना त्यांचा मृतदेह मिळून आला. सुमारे आठ-दहा दिवसांपूर्वी विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. आढाव हे हॉटेलमध्ये काम करीत होते. कोरोना महामारीनंतर त्यांचा रोजगार बंद झाला. पत्नी काम करून प्रपंच चालवत होती. त्यातच राजेंद्र यांना आजार झाल्याने औषधोपचाराचा खर्चही वाढला होता. त्यामुळे आजाराला कंटाळलो असून, माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये, अशी चिठ्ठी लिहून ठेवून ते २८ नोव्हेंबरला घरातून निघून गेले होते. नातेवाइकांनी त्यांचा शोध घेऊनही ते मिळून येत नसल्याने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद झाली होती.