सौंदर्याच्या यशामुळे इचलकरंजीचा लौकीक; सुधाकर देशमुख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सौंदर्याच्या यशामुळे इचलकरंजीचा लौकीक; सुधाकर देशमुख
सौंदर्याच्या यशामुळे इचलकरंजीचा लौकीक; सुधाकर देशमुख

सौंदर्याच्या यशामुळे इचलकरंजीचा लौकीक; सुधाकर देशमुख

sakal_logo
By

71099
इचलकरंजी : राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल सौंदर्या पाटीलचा सत्कार करताना महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक सुधाकर देशमुख, अशोक जांभळे आदी.


सौंदर्याच्या यशामुळे इचलकरंजीचा लौकीक
सुधाकर देशमुख; चित्रकला स्पर्धेतील यशाबद्दल सत्कार, लाखाचे बक्षीस
इचलकरंजी, ता. २६ : हिरा-राम गर्ल्स हायस्कूलच्या सौंदर्या पाटील हिच्या यशामुळे शिक्षण संस्थेचेच नव्हे, तर वस्त्रनगरी इचलकरंजीचे नाव भारताच्या नकाशात सुवर्णाक्षरांनी कोरले असून, शहराचा लौकीक वाढला, असे गौरवोद्गार महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांनी काढले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष अशोक जांभळे यांच्यातर्फे सौंदर्याला एक लाख एक हजार एक रुपये प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.
सौंदर्या पांडुरंग पाटीलने केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने घेतलेल्या राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत देशपातळीवर तृतीय क्रमांक मिळवला. या यशाबद्दल अशोका हायस्कूलच्या प्रांगणात शिक्षण संस्था आणि इचलकरंजी विधानसभा राष्ट्रवादीतर्फे तिचा नागरी सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी अशोका शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, माजी आमदार जांभळे होते. या वेळी मार्गदर्शक कला शिक्षक श्रीरंग मोरे यांचाही सत्कार केला. प्रारंभी शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कै. दत्ताजीराव कदम यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर डेक्कन येथून जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली. या वेळी भागातील नागरिकांनी सौंदर्याचे उत्साहात स्वागत केले. मिरवणूक शाळेत पोहचल्यावर सौंदर्यावर पुष्पवृष्टी करत स्वागत केले. या वेळी राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे, लतिफ गैबान, कलावती जांभळे, विठ्ठल चोपडे, राजू खोत, संस्थेचे उपाध्यक्ष थरकार यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी चित्रकला स्पर्धेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या अशोका हायस्कूलमधील विद्यार्थी रोहन पोवार, नजीर मकानदार यांना प्रत्येकी पाच हजार रुपये रोख रक्कम बक्षीस देण्यात आले. मुख्याध्यापिका म्हाकाळे, के. जे. करपे, एस. एस. पाटील, एस. एच. व्हनागडे, एस. एस. सपकाळ यांसह शिक्षण संस्थेतील सर्व मुख्याध्यापिका, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.