रोटरीतर्फे ५ जानेवारीपासून ट्रेडफेअरचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोटरीतर्फे ५ जानेवारीपासून
ट्रेडफेअरचे आयोजन
रोटरीतर्फे ५ जानेवारीपासून ट्रेडफेअरचे आयोजन

रोटरीतर्फे ५ जानेवारीपासून ट्रेडफेअरचे आयोजन

sakal_logo
By

‘रोटरी’तर्फे ५ जानेवारीपासून
ट्रेड फेअरचे आयोजन
इचलकरंजी, ता. २८ : येथील स्टेशन रोडवरील डॉ. आंबेडकर पुतळ्यानजीक केएटीपी मैदानावर रोटरी क्लबतर्फे रोटरी ट्रेड फेअरचे आयोजन केले आहे. हे ट्रेड फेअरचे २२ वे वर्ष आहे. यावर्षीही प्रदर्शनाचे दिमाखात नियोजन केले असून, ५ जानेवारीला या ट्रेड फेअरला प्रारंभ होणार असल्याची माहिती रोटरीचे अध्यक्ष सत्यनारायण धूत आणि ट्रेड फेअरचे अध्यक्ष मुकेश जैन यांनी दिली.
रोटरी ट्रेड फेअर म्हणजे इचलकरंजी आणि परिसरातील व्यावसायिक, उत्पादक, विक्रेते, संस्था यांना आपली उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची ही उत्तम पर्वणी आहे. या प्रदर्शनात यावर्षी इलेक्ट्रॉनिक-इलेक्ट्रिकल वस्तू, गृहोपयोगी उत्पादने, इ-बाईक, गारमेंट मशिनरी, वॉटर प्युरिफायर, ड्रेस मटेरियल, आर्टीफिशियल ज्वेलरी, एज्युकेशन, सोलर, अ‍ॅक्युप्रेशर बॉडी मसाज, व्यायामाची साधने, आयुर्वेदिक उत्पादने, सौंदर्यप्रसाधने, विविध प्रकारचे मसाले यांचे स्वतंत्र विभाग मांडण्यात येणार आहेत. थेट शेतकऱ्यांकडून हळद, ज्वारीचा चिवडा उपलब्ध केला जाणार आहे. खवय्यांसाठी शुद्ध शाकाहारी अत्यंत लज्जतदार व हायजेनिक पद्धतीने बनवलेले खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल, मनोरंजनाचे विविध कार्यक्रम, बालचमूंसाठी मिनि वर्ल्ड असणार आहेत. महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले असून, ट्रेड फेअर पाहण्यास येणाऱ्यां‍साठी प्रवेश कूपनवर दररोज लकी ड्रॉ काढून आकर्षक बक्षिसे दिले जाणार आहेत. ट्रेड फेअरमधून मिळणाऱ्या रकमेतून रोटरी वर्षभर गरजू लोकांना मदत, प्लास्टिक सर्जरी शिबिर, विविध शाळांना संगणक, बेंचेस, स्वच्छतागृह, पोलिओ निर्मूलन, वृक्षारोपण, विद्यार्थी दत्तक योजना, व्होकेशनल अॅवॉर्ड, विविध कला-क्रीडा स्पर्धांचे आयोजन, महिलांना स्वावलंबनासाठी मदत, विद्यार्थ्यांना सायकल वितरण, दिव्यांगासाठीचे कार्यक्रम, मोतिबिंदू शस्त्रक्रिया, गरजूंची वैद्यकीय तपासणी, रक्तदान शिबिर, प्रशिक्षण शिबिर यासह विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवत असल्याचे धूत आणि जैन यांनी सांगितले.