विविध भावभावनांचा अविष्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विविध भावभावनांचा अविष्कार
विविध भावभावनांचा अविष्कार

विविध भावभावनांचा अविष्कार

sakal_logo
By

05257
इचलकरंजी : स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी सादर झालेल्या ब्लाइंड स्पेस या एकांकिकेतील एक दृश्य.
---------
लोगो ः मनोरंजन करंडक एकांकिका स्पर्धा
-----------
विविध भावभावनांचा अविष्कार
तिसऱ्या दिवशी विविध ठिकाणांहून संघ सहभागी
इचलकरंजी, ता.३० : मनोरंजन करंडक राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी विविध ठिकाणच्या स्पर्धक संघानी वेगवेगळ्या विषयांवरील आठ एकांकिका सादर केल्या. विविध भावनांच्या अविष्काराचा अनुभव रसिकांना दिला.
समांतर सांगली या संघाने मर्सिया ही एकांकिका सादर केली. आई आणि मुलगी रात्री रस्त्यामध्ये बंद पडलेल्या रिक्षात अडकतात, त्यावेळी त्यांच्या मनमोकळ्या संवादातून ही एकांकिका खुलत गेली. दुसरी एकांकिका देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स कोल्हापूर या संघाने जन्नत ऊल फिरदौस ही एकांकिका सादर केली‌. एक वृद्ध गृहस्थ आणि त्यांची अंध नात या दोघांमधील अनोखे भावबंध रसिकांच्या मनाला स्पर्शून गेली. तिसरी एकांकिका साई कला मंच इचलकरंजी या संघाने सादर केली. माणूस हा बरेचदा क्षणभंगुर सुखाच्या हव्यासात अडकून अधिकच वेदनांमध्ये गुरफटत जातो, पण हे कधीतरी संपणार आहे याची जाणीव या एकांकिकेत करून देण्यात आली.
त्यानंतर सावंतवाडी येथील सृजन या संघाने आमुशा ही एकांकिका सादर केली. भणंग आयुष्य जगणारा एक जोगता, त्याच्या जीवनात आलेल्या बेवारस मुलाला सांभाळतो आणि त्या मुलाला शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देतो अशी कथा यामध्ये मांडण्यात आली. त्यानंतर येथीलच रंगयात्रा या संघाने हा वास कुठून येतोय ही एकांकिका सादर केली. कोरोना काळात मनोरंजन क्षेत्रावर घातलेले निर्बंध व त्यामुळे रंगकर्मींची झालेली अवस्था आणि त्यांची होरपळ तसेच त्यांचे रंगमंचाशी असलेले नाते व प्रेम यांचं प्रतिकात्मक कथानक यामध्ये परिणामकारक मांडले. कोल्हापूरच्या इव्हॉलवीन मीडिया या संघाने त्यापुढील होतं असं कधी कधी ही एकांकिका उत्स्फूर्त शैलीत सादर केली. शेवटी अभिरुची कोल्हापूर या संघाने हात धुवायला शिकवणारा माणूस ही एकांकिका प्रभावीपणे सादर केली. येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात सुरू असलेली एकांकिका स्पर्धा रसिकांचा छान प्रतिसाद मिळत आहे. परिसरातील रसिकांबरोबर गोवा येथील रसिकही या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित होते.
-----
कुटुंबाला एकमेकांचा आधार
तिसऱ्या दिवशी शेवटच्या सत्रात स्टोरीया प्रॉडक्शन कल्याण या संघाने ब्लाइंड स्पेस ही सुरेख भावपूर्ण एकांकिका सादर केली. नचिकेत दांडेकर यांचे लेखन होते तर संकेत पाटील यांनी दिग्दर्शन केले होते. कुटुंबातील प्रत्येक नात्याला त्याच्या स्पेसची गरज असते. पण त्याचबरोबर त्या कुटुंबाला एकमेकांच्या जवळकिची आणि आधाराची गरज असते असा आशय यामध्ये होता.