महिलेची लूट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलेची लूट
महिलेची लूट

महिलेची लूट

sakal_logo
By

प्रवासी महिलेचे सव्वानऊ
तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरीस

इचलकरंजी बस स्थानकातील घटना

इचलकरंजी, ता. ३१ : गडहिंग्लज येथील प्रवासी महिलेला इचलकरंजी मध्यवर्ती बस स्थानकात लुटल्याची घटना उघडकीस आली. ३ लाख ६४ हजार किमतीचे तब्बल सव्वानऊ तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे. ही घटना बस स्थानकातील फलाट क्रमांक ९ वर आज दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, येथील बस स्थानकात प्रवाशांची वर्दळ असते. अशा गर्दीत ज्योती घेवडे या गडहिंग्लजला जाणाऱ्या फलाटावर थांबल्या होत्या. त्यांच्या पर्समध्ये सोन्याच्या दागिन्यांचा ३ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल होता. गर्दीचा फायदा घेत चोरट्याने या मुद्देमालावर डल्ला मारला. पाहता पाहता चोरटा क्षणात पसार झाला. महिलेने आरडाओरड केल्याने घटनास्थळी गर्दी केली. याठिकाणी पोलिसांनी धाव घेत माहिती घेतली. काही दिवसांपूर्वी अशाच एका प्रवाशाची चोरी झाली होती. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी शिवाजीनगर पोलिसांनी बस स्थानकात जाऊन सीसीटिव्हीची पाहणी करून सुधारणा केल्या, मात्र चोरट्याने धाडस दाखवत पुन्हा मोठी चोरी केली.
चोरीत २ लाख किमतीचे पाच तोळे वजनाच्या सोन्याच्या पट्ट्या व पदक असलेले सोन्याचे गंठण, १ लाख २० हजार रुपयांचे तीन तोळे वजनाचा राणीहार, ८८ हजार रुपये किमतीचे २.५ ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे टॉप्स, ३० हजार रुपये किमतीचे ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे वेल तसेच ६ हजार रुपये किमतीचे २ ग्रॅम वजनाचे नाकातील सोन्याची नथ असा मुद्देमाल चोरीला गेला आहे. याप्रकरणी फिर्याद ज्योती संजय घेवडे यांनी पोलिसांत दिली आहे.