
खंडणी, विनयभंग
खंडणीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल
इचलकरंजी : एका रेकॉर्डवरील गुन्हेगारावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात खंडणी व विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. शाहरुख जावेद जमादार (रा. इचलकरंजी) असे त्याचे नाव आहे. मुलाला मारहाण केल्याचा जाब विचारण्यास गेल्यानंतर त्याने पीडित महिलेला मारहाण केली आणि अश्लील भाषेत शिवीगाळ करत अंगावर धावून गेला. याबाबतची फिर्याद पीडित महिलेने दिली आहे. चिकन गाड्यावरील पीडितेच्या अल्पवयीन मुलास जमादार हा तुमचा चिकनचा गाडा उद्ध्वस्त करतो, अशी भीती घालून वारंवार पैसे मागत होता. आज जमादार याने पुन्हा मुलास अडवून त्याच्याकडे एक हजार रुपयांची मागणी केली. त्याने पैसे नसल्याचे सांगताच जमादार याने त्याच्या कानाखाली मारली. मुलाने मारहाण झाल्याचा प्रकार घरात सांगितला. याचा जाब विचारण्यास गेलेल्या पीडित महिलेला जमादार याने अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि अंगावर धावून गेला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात जमादार याच्याविरोधात विनयभंग आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.