मराठीच्या सदृढतेसाठी प्रयत्न आवश्यक

मराठीच्या सदृढतेसाठी प्रयत्न आवश्यक

05345
इचलकरंजी : राज्य बालनाट्य स्पर्धेच्या उद्‍घाटनप्रसंगी सोमवारी दीपप्रज्वलन करताना सुधाकर देशमुख. डॉ. एस.पी. मर्दा, राहूल खंजिरे आदी.
------
मराठीच्या सदृढतेसाठी प्रयत्न आवश्यक
आयुक्त सुधाकर देशमुख; इचलकरंजीत बालनाट्य स्पर्धेस प्रारंभ
इचलकरंजी, ता.९ : मराठी भाषा ही मूलतः समृद्ध आहे. पण कालानुरूप आपली भाषा अधिक सदृढ करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्याचाच एक भाग म्हणून मराठी बालनाट्य स्पर्धा चळवळ हा उपयुक्त असा उपक्रम आहे, असे प्रतिपादन महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले.
येथील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन उपक्रमातंर्गत आयोजित राज्यस्तरीय मराठी बालनाट्य स्पर्धेच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. आयुक्त देशमुख, नाट्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. मर्दा, परीक्षक व रंगकर्मी विश्वास पांगारकर (पुणे), उदय गोडबोले (सांगली), संजय सातपुते (इचलकरंजी) यांच्याहस्ते नटराज प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्‍घाटन केले.
डॉ. मर्दा यांनी बालनाट्य स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होण्यास चालना मिळते, असे सांगितले. इचलकरंजी इंडस्ट्रियल इस्टेट को-ऑपरेटिव्ह इस्टेटचे चेअरमन राहुल खंजिरे म्हणाले,‘आजच्या जगातील विद्यार्थ्यांना मोबाईलसारख्या साधनांपासून दूर ठेवून त्यांच्यात कलेची आवड निर्माण करण्यासाठी अशा स्पर्धा उपयुक्त आहेत.’ नाट्य परिषदेचे कार्यवाह मनीष आपटे यांनी स्वागत केले. स्पर्धा समन्वयक मिलिंद दांडेकर यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष राजन मुठाणे यांच्याहस्ते पाहुण्यांचे स्वागत केले. आभार कार्यवाह संतोष आबाळे यांनी मानले. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. अशोक दास, महानगरपालिकेचे प्रतिनिधी संजय कांबळे, ग्रंथपाल बेबी नदाफ, अमेय मराठे उपस्थित होते.
-----------
बालनाट्यात रमले चिमुरडे
ऐतिहासिक, सामाजिक नाट्य सादरीकरणातून नेमका संदेश देत बालकलाकारांनी गतवर्षी बालनाट्य स्पर्धा गाजवली. त्यामुळे यंदा दुसऱ्या वर्षी नाट्य चळवळीच्या दृष्टीने बाल रंगभूमी, शालेय रंगभूमी हा उपक्रम घेत स्पर्धेचे आयोजन केले आहे. राज्यभरातील तब्बल १८ संघ सामाजिक, भावस्पर्शी, कलात्मक आशयाची नाटके छान सादर करणार आहेत. शहरातील विविध शाळातील विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी नाट्यगृह खचाखच भरले. रंगमंच आणि रंगमंचासमोरही चिमुरडे बालनाट्यात रमून गेली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com