विद्यार्थ्यांनी कर्तव्य, जबाबदारीची जाणीव ठेवावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांनी कर्तव्य, जबाबदारीची जाणीव ठेवावी
विद्यार्थ्यांनी कर्तव्य, जबाबदारीची जाणीव ठेवावी

विद्यार्थ्यांनी कर्तव्य, जबाबदारीची जाणीव ठेवावी

sakal_logo
By

05420
इचलकरंजी : दि न्यू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या पारितोषिक वितरण समारंभात बोलताना प्रसाद कुलकर्णी. व्यासपिठावर मान्यवर.
---------
विद्यार्थ्यांनी कर्तव्य, जबाबदारीची जाणीव ठेवावी
प्रसाद कुलकर्णी; दि न्यू हायस्कूलमध्ये पारितोषिक वितरण
इचलकरंजी, ता. १६ : उद्याचा भारत घडवण्यासाठी विद्यार्थ्यांनी कर्तव्य व जबाबदारी यांची जाणीव करून घेतली पाहिजे. चांगली जीवनशैली निर्माण करण्यासाठी मनाचे शुद्धीकरण, काटकसर व मानवतावाद या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी केले.
दि न्यू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मुख्याध्यापक एस. ए. पाटील यांनी शाळेतील वर्षभरातील उपक्रम व विविध विभागातील शाळेच्या यशाचा चढता आलेख अहवाल वाचनातून मांडला. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन अरुणराव खंजीरे होते. समाजकारण, अर्थकारण व राजकारण या विविध क्षेत्रात अनेक संधी आहेत. त्यासाठी कठोर परिश्रम करा व यश मिळवा असे मनोगत त्यांनी केले. विविध वैयक्तिक व सांघिक स्पर्धेमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते केला. प्रास्ताविक व स्वागत बी. ए. कोळी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय एस. डी. मणेर यांनी करून दिला. आभार एम. के. परीट यांनी मानले. सूत्रसंचालन सौ. एस. ए. बिरनाळे व एस. के पाटील यांनी केले. संस्थेचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब मुरदंडे, सेक्रेटरी शेखर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.