माणसाला घडवण्याची वेळ भाषेवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माणसाला घडवण्याची वेळ भाषेवर
माणसाला घडवण्याची वेळ भाषेवर

माणसाला घडवण्याची वेळ भाषेवर

sakal_logo
By

05471
इचलकरंजी : गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर व्याख्यानमालेत सोमवारी अजीम राही यांचे व्याख्यान झाले.
----------
माणसाला घडवण्याची वेळ भाषेवर
लेखक व कवी अजीम राही; टागोर व्याख्यानमालेत पहिले पुष्प
इचलकरंजी, ता. २४ : माणसाकडे आर्थिक सुबकता आली आहे. मात्र मानसिकस्थिती हरवत चालली आहे. बिघडणाऱ्या जगाला घडवणारी कृती भाषेतून साहित्य करत असते. बेचव जगण्याला स्वाद देण्याचे काम साहित्य करत आहे. माणसाने भाषेला घडवले आणि आता माणसाला घडवण्याची वेळ भाषेवर आली आहे, असे प्रतिपादन प्रख्यात मराठी लेखक व कवी अजीम राही यांनी केले.
गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ‘मी आणि माय मराठीची आभाळ माया’ या विषयावर ते बोलत होते. मराठी भाषा संवर्धन उपक्रमांतर्गत इचलकरंजी महानगरपालिकेतर्फे व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. यंदा हे व्याख्यानमालेचे पंधरा वर्षे आहे. उद्‍घाटनप्रसंगी रवींद्रनाथ टागोर यांचे प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले. व्यासपीठावर उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, नगरसचिव विजय राजापुरे, ग्रंथपाल बेबी नदाफ, माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, प्रकाश मोरबाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
राही म्हणाले, ‘वडिलोपार्जित मळवाट वडिलांनी दिली आणि जगण्यासाठी भटकंती सुरू झाली. पोट भरता भरता माणूस वाचण्याच्या सवयीतून ग्राम संस्कृतीची जाणीव झाली. मोसमी व्यवसाय करता करता वाचनाची तहान रद्दीने भागवली. यामुळे जगण्याला एक रसद मिळाली. यातूनच मराठी साहित्य काळजात मुक्कामाला आले. दहावीत असताना गणिताने दगा दिला आणि इंग्रजीशी सुत न जुळल्याने नापास व्हावे लागले. मात्र माय मराठीचे शब्द पदरात पडले. मराठीच्या आभाळाएवढ्या मायेने जीवन उभे राहिले. त्यामुळे भाषेवर जगता येते हे सिद्ध झाले. दुःख आहे तोपर्यंत मराठी भाषेतील साहित्याला पर्याय नाही.’