
‘रोटरी’तर्फे सायकली वितरीत
ich71.jpg
80984
इचलकरंजी : रोटरी क्लबच्या वतीने शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी सायकली वितरित करण्यात आल्या.
‘रोटरी’तर्फे सायकली वितरित
इचलकरंजी : रोटरी क्लबतर्फे विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी ५५ सायकली वितरित केल्या. रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर डॉ. प्रशांत कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला. विद्यार्थ्यांना शाळेत येण्याजाण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी व त्यांच्या शिक्षणासाठी बळ देण्यासाठी हा उपक्रम घेतला. यामध्ये ग्रामीण भागातील मुला-मुलींना सायकली दिल्या. रोटरी क्लबचे अध्यक्ष सत्यनारायण धूत यांनी स्वागत केले. नेमिनाथ कोथळे यांनी रोटरीच्या कामांचा आढावा घेतला. सूत्रसंचालन करून आभार रोटरीचे सेक्रेटरी प्रकाश गौड यांनी मानले. मनीष मुनोत, डी. एम. कस्तुरे, अजित कुरडे, संजय घायतिडक, चंद्रकांत मगदूम आदी उपस्थित होते.
---------
ich72.jpg
80985
इचलकरंजी : डीकेएएससी महाविद्यालयाची खेळाडू संतोषी फातले हिचा प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांच्या हस्ते सत्कार केला.
संतोषी फातलेची निवड
इचलकरंजी : डीकेएएससी महाविद्यालयाची खेळाडू संतोषी फातले हिची शिवाजी विद्यापीठ संघात निवड झाली आहे. गडहिंग्लज येथे झालेल्या शिवाजी विद्यापीठाच्या आंतरविभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत ५९ किलो वजनी गटात १४४ किलो वजन उचलून तिने सुवर्णपदक पटकावले. तिची कालिकत येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी विद्यापीठ संघात निवड झाली आहे. तिचा प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांच्या हस्ते सत्कार केला. प्रा. मेजर मोहन वीरकर, प्रा. मुजफ्फर लगीवाले, प्रा. प्रशांत कांबळे आदींचे मार्गदर्शन लाभले.
-------
कन्या महाविद्यालयात चर्चासत्र
इचलकरंजी : श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागातर्फे अर्थसंकल्प २०२३ यावर चर्चासत्र झाले. अर्थसंकल्पातील कृषी, आरोग्य, उद्योग, शिक्षण, संरक्षण अशा विविध क्षेत्रांसाठीच्या तरतुदींच्या अनुषंगाने विद्यार्थिनी ममता यादव, प्रांजली भोसले, प्रियांका सागर, ऋतुजा हरसुरे यांनी मनोगत व्यक्त केले. संविधान गुणगौरव परीक्षेच्या प्रमाणपत्राचेही वितरण केले. संविधान गुणगौरव परीक्षा केंद्र प्रमुख कॅप्टन प्रमिला सुर्वे उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी प्रा. संगीता पाटील होत्या. प्रभारी प्राचार्या प्रो. डॉ. त्रिशला कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. स्वागत व प्रास्ताविक डॉ. संपदा टिपकुर्ले यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. स्नेहल पोवार यांनी केले.
-----
‘रोटरी’तर्फे वधू-वर मेळावा
इचलकरंजी : रोटरी क्लब व रोटरेक्ट क्लब ऑफ द डेफ यांच्यामार्फत कर्णबधिर वधू-वर परिचय मेळावा झाला. अध्यक्षस्थानी माजी आमदार राजीव आवळे होते. २७० कर्णबधिर युवक, युवती व पालक उपस्थित होते. स्वागत सौ. स्मिता रणदिवे यांनी केले. प्रास्ताविक भरत पवार यांनी केले. आभार संतोष गांगोडे यांनी मानले. डी. एम. कस्तुरे, डॉ. दिलीप देशमुख, सत्यनारायण धूत, प्रकाश रावळ, कमिटी चेअरमन पिरगोंडा पाटील उपस्थित होते.
------
हेल्थ केअर सेंटर सुरू
इचलकरंजी : श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात हेल्थ केअर सेंटरचे उद्घाटन झाले. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, तांबे माळ यांच्या सहकार्याने आरोग्य शिबिर महाविद्यालयाच्या दारी व जागरूक पालक - सदृढ बालक या अभियान अंतर्गत हेल्थ केअर सुरू केले. प्रभारी प्राचार्या प्रो. डॉ. त्रिशला कदम यांनी महाविद्यालयातील कर्मचारी व विद्यार्थिनींनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रा. वर्षा पोतदार यांनी केले. आभार प्रा. कुंभार यांनी मानले. डॉ. शोभा लांडे, डॉ. काश्मिरी बडबडे प्रा. संगीता पाटील, प्रा. डॉ. धीरज शिंदे, प्रा. मनीषा गवळी आदी उपस्थित होते.
-----