Sat, March 25, 2023

विनयभंग गुन्हा
विनयभंग गुन्हा
Published on : 7 February 2023, 4:05 am
अश्लील वर्तनप्रकरणी एकावर गुन्हा
इचलकरंजी : मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी एकावर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गजानन कदम (रा. गणेशनगर, गल्ली नंबर ३, शहापूर) असे त्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद पीडित महिलेने पोलिसांत दिली आहे. पीडित महिलेचा पती मृत झाला आहे. याचा फायदा घेऊन संशयित हा गेल्या दोन वर्षांपासून या महिलेला मानसिक त्रास देत होता. पाठलाग करून अश्लील हातवारेही करत होता. तसेच पीडित महिला घरातून बाहेर पडल्यानंतर पाठलाग करून मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करीत होता. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गजानन कदम याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.