बाहेरून पालेभाज्यांची आवक

बाहेरून पालेभाज्यांची आवक

05582
इचलकरंजी : १) फळ बाजारात रामफळाची आवक तुटक तुटक आहे.
05581
२) फुल विक्रेत्यांकडे गुलाबाच्या फुलांसह बुकेला मागणी सर्वाधिक आहे.
--------------------
बाहेरून पालेभाज्यांची आवक
खाद्यतेलाच्या दराने दिलासा; मागणी वाढल्याने गुलाबांचा तुटवडा
इचलकरंजी, ता. ९ : गेल्या आठवड्यात घटलेल्या पालेभाज्यांची आवक या आठवड्यात वाढल्याचे चित्र आहे. स्थानिक आवक कमी झाली असली तरी बाहेरून आवक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दहा रुपयाला एक येणारी पेंढी आता जोडी मिळत आहे. आवक आणि दरवाढीचा परिणाम अद्याप फळभाज्यांवर झालेला नाही. लिंबूच्या दराचा चटका मात्र आता हळूहळू तीव्रपणे जाणवत आहे.
खाद्यतेल बाजारात तेलाचे भाव दिलासा देणारे आहेत. सरकी, सोयाबीन पाठोपाठ सूर्यफुलाच्या दरात मोठी घट झाली आहे. बाजारात सोयाबीनचा साठा अधिक आहे. येत्या दिवसांत तेलाचे भाव आणखीन कमी होऊ शकतात. शेंगतेल मात्र भाव खात आहे. लग्न, साखरपुडा आणि व्हॅलेंटाईन सप्ताहामुळे फुल बाजार तेजीत आहे. फुलांच्या दरात दुप्पटीने वाढ झाली आहे. गुलाबांना मागणी वाढल्याने तुटवडा जाणवत आहे. फुल विक्रेत्यांकडे गुलाबाच्या फुलांसह बुकेला मागणी सर्वाधिक आहे. फळ बाजारात द्राक्षांची आवक बेसुमार होत आहे. दुर्मिळ झालेल्या रामफळाची आवक आता तुटक तुटक आहे. कलिंगडाच्या हंगामाने चांगलाच तग धरला आहे.
----
प्रति किलो रुपये भाज्यांचे दर : टोमॅटो-१५ ते २०, दोडका- ५० ते ६०, वांगी- ३० ते ४०, कारली- ४० ते ५०, ढोबळी मिरची- ४० ते ५०, मिरची -५० ते ६०, फ्लॉवर- १५ ते २०, कोबी-१५ ते २०, बटाटा- २५ ते ३०, कांदा -१५ ते २०, लसूण- ८० ते १००, आले- ६० ते ८०, लिंबू- २०० ते ४०० शेकडा, गाजर -३० ते ४०, बीन्स- ४० ते ५०, ओला वाटाणा -३० ते ४०, चवळी शेंगा -७० ते ८०, भेंडी- ६० ते ८०, काकडी-४० ते ५०, गवार- ८० ते १००, रताळे -३० ते ४०, दुधी -३० ते ४०, पालेभाज्या ५ ते ७ रुपये, शेवगा ७ ते ८ रुपये नग.
- - - - - - - -
खाद्यतेल : सरकी -१२५ ते १३०, शेंगतेल - १७५ ते १८०, सोयाबीन - १३० ते १३५, पामतेल - ११० ते ११५, सूर्यफूल -१३५ ते १४०.
- - --- - - -
फुले : झेंडू - ८० ते १००, निशिगंध- ३००, गुलाब - २५० ते ३००, गलांडा- ७० ते ८०, शेवंती- १५०, आष्टर - २००.
- - - -- - -
फळे : सफरचंद-८० ते १६०, संत्री -६० ते १००, मोसंबी-८० ते १००, डाळिंब-८० ते १५०, चिकू-८० ते १२०, पेरू-३० ते १००, सीताफळ -८० ते १००, खजूर - १५० ते २००, द्राक्षे - १०० ते १५०, कलिंगड -५६ ते ६०, पपई- ३० ते ५०, अननस -८० ते १००, मोर आवळा -८० ते १००, द्राक्षे- १८० ते २००, केळी- ५० ते ६० डझन, देशी केळी - ६० ते ७० डझन, किवी -२०० ते २२०, स्ट्रॉबेरी-५० ते ६० (लहान बॉक्स), चिंच-१०० ते १४०, लेची -३५० ते ४००.
-- -
कडधान्य : हायब्रीड ज्वारी- ३१ ते ४८, बार्शी शाळू- ४० ते ५०, गहू- ३५ ते ४०, हरभराडाळ -५८ ते ६३, तूरडाळ- १०३ ते ११०, मूगडाळ- ९५ ते १००, मसूरडाळ- ७६ ते ७८, उडीदडाळ- ९० ते १००, हरभरा- ५२ ते ५६, मूग-८५ ते ९३, मटकी- १३० ते १३५, मसूर- ७०, फुटाणाडाळ -७० ते ७२, चवळी-७५ ते ८३, हिरवा वाटाणा- ५५, छोला -१२५ ते १४०.
- - - - - - - - - - - -
(केळी फोटो वापरा)

केळी खातायत भाव
बाजारात केळींची उपलब्धता कमी असून तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे बाजारभावाचा आलेख दररोज उंचावत आहे. केळींचे आगार असणाऱ्या सर्व भागांतून होणारी केळींची उपलब्धता कमी आहे. १८ फेब्रुवारीला महाशिवरात्रीचा उपवास असल्याने मागणी वाढून केळींचे भाव आणखीन वाढू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com