दंत शिबिरात ४५० विद्यार्थ्यांची तपासणी

दंत शिबिरात ४५० विद्यार्थ्यांची तपासणी

सकाळ एनआयई लोगो वापरावा
05588
इचलकरंजी : येथे ‘सकाळ एनआयई''तर्फे माई बाल विद्यामंदिरात दंत तपासणी उपक्रम झाला.
-----
दंत शिबिरात ४५० विद्यार्थ्यांची तपासणी
इचलकरंजीत ‘सकाळ एनआयई''तर्फे आयोजन; दातांच्या काळजीबाबत मार्गदर्शन
इचलकरंजी, ता.९ : विद्यार्थ्यांना आरोग्य आणि दातांची काळजी याचे महत्त्व कळावे, या उद्देशाने ‘सकाळ एनआयई’ने येथील माई बाल विद्यामंदिरात दंत तपासणी उपक्रम राबवला. कोल्हापूरचे दंतचिकित्सक डॉ. आशुतोष देशपांडे यांनी उपक्रमात सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांची दंत तपासणी करून त्यांना योग्य सल्ला दिला. शिबिराचा विद्यामंदिराच्या सुमारे ४५० अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
दातांची काळजी घेण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. देशपांडे म्हणाले, ‘दातांची योग्य निगा राखली नाही तर दुखणे वाढून आपण हसणे हरवून जातो. जेवताना नेहमी प्रसन्न वृत्ती ठेवून जेवावे. दात तंदुरुस्त राहिले तरच जीवन तंदुरुस्त राहणार आहे. दातांचा व्यायाम करत रहा.’ विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. देशपांडे यांनी उत्तरे दिली. रात्री झोपताना दात घासूनच झोपेन, चॉकलेट खाल्यानंतर चुळ भरेन, अशी प्रतिज्ञा विद्यार्थ्यांनी केली.
यानंतर विद्यार्थ्यांची दंत तपासणी केली. पहिली ते चौथीच्या सुमारे ४५० हून अधिक विद्यार्थ्यांनी क्रमवार दंत तपासणीचा लाभ घेतला. डॉ. देशपांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची दंत तपासणी करता करता त्यांना दातांची काळजी घेण्याबाबत योग्य सल्ला दिला. उपक्रमात संस्थेच्या अध्यक्षा निर्मला ऐतवडे, सचिवा डॉ. मीना तोसनिवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबीराला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला. मुख्याध्यापिका सौ. शैला कांबरे यांनी विद्यार्थ्यांना ''सकाळ''च्या उपक्रमांची माहिती दिली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ‘सकाळ एनआयई''चे उदय माळी, वितरण प्रतिनिधी संतोष शिंदे, बातमीदार ऋषीकेश राऊत यांनी परिश्रम घेतले. उपक्रमास सौ. रजनी घोडके, सौ. नाईक, सौ. नेजे, आरती पाटील, सौ. कवटगे , सौ.राणी माने, मानसी जोशी आदींचे सहकार्य लाभले.
-------
कोट
सकाळ एनआयई हा अंक विद्यार्थ्यांच्या बौद्धिक वाढीसाठी माहितीचा खजिना आहे. एनआयई यासह विद्यार्थ्यांच्या आरोग्याचीही काळजी घेते, ही मोठी समाधानाची बाब आहे. सकाळ एनआयईचा उपक्रम स्तुत्य आहे.
-सौ. शैला कांबरे, मुख्याध्यापिका, माई बाल विद्यामंदिर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com