Thur, June 1, 2023

विनयभंग
विनयभंग
Published on : 9 February 2023, 2:12 am
महिलांशी अश्लील वर्तन; एकावर गुन्हा दाखल
इचलकरंजी : महिलांशी अश्लील वर्तन करत शिवीगाळ केल्याप्रकरणी एकावर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शिवाजी राजाराम ओलेकर (वय ५० रा. खोतवाडी) असे त्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद एका पीडित महिलेने पोलिसांत दिली. रात्रीच्या वेळी महिलांच्या घरी जाऊन फोन नंबर मागणे यांसह अश्लील वर्तन तो करत होता. तसेच दारूच्या नशेत दुचाकी चालवत महिलांना त्रास दिला. दोन दिवसांपासून तो महिलांना पाहून मोठमोठ्याने खेकारत अश्लील भाषेत बोलत होता. त्यामुळे पीडित महिलांनी शहापूर ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार ओलेकर याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.