इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये कार्यशाळा

इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये कार्यशाळा

ich122.jpg
82221
इचलकरंजी : कलाशिक्षक संजय फुले यांनी हस्तकलामध्ये विदूषकाची टोपी बनवण्याचा उपक्रम घेतला.

इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये कार्यशाळा
इचलकरंजी : डीकेटीच्या इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर कार्यशाळा झाली. प्रमुख वक्ते अशोक केसरकर यांनी प्रबोधन केले. कलाशिक्षक संजय फुले यांनी हस्तकलेमध्ये विदूषकाची टोपी बनवण्याचा उपक्रम घेतला. डॉ. सौ. मनीषा शेट्टी यांनी आरोग्य जागरुकता या विषयावर मार्गदर्शन केले. शंकर जाधव यांनी जादूचे प्रयोग करून दाखवले. विश्वास माने, सौ. स्नेहा लेले आणि विविध खेळ घेतले. स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. भारती कासार यांनी केले. सूत्रसंचालन सौ. सुलभा पाटील यांनी केले. आभार सौ. असिफा मुल्ला यांनी मानले.
-----
ich123.jpg
82222
इचलकरंजी : विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेत इचलकरंजी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले.
इचलकरंजी हायस्कूलचे यश
इचलकरंजी : इचलकरंजी हायस्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेजने विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त केले. सहावीमधील तीन विद्यार्थी प्रज्ञापात्र व चार प्रमाणपत्रधारक बनले. नववीमधील प्रत्येकी दोन प्रज्ञापत्र व प्रमाणपत्रधारक बनले. परीक्षेत प्रीत बाळेकाई, दक्ष शेटे, साहिर दरबान, पूर्वा माने, अर्पिता वायचळ, वरद माणेकरी, अर्णव पाटील, मैथिली ढवळे, धीरज खराडे, आयूष चौगुले, शिवराज पाटील यांनी यश मिळवले. विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका श्रीमती व्ही. एच. उपाध्ये, पर्यवेक्षक यू. पी. पाटील, विज्ञान विभागप्रमुख आर. ए. पाटील आदींचे मार्गदर्शन लाभले.
-----
ich124.jpg
82223
इचलकरंजी : इंग्लिश मीडियम स्कूलच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात विद्यार्थ्यांचा सन्मान केला.
इंग्लिश मीडियम हायस्कूलचे स्नेहसंमेलन
इचलकरंजी : इंग्लिश मीडियम हायस्कूलचे वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन झाले. प्रमुख पाहुणे ऋषिकेश साखरपे, बाळासाहेब केतकाळे, संस्थेच्या मानद सचिव डॉ. सौ. सपना आवाडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन केले. संस्थेचे समुपदेशक अशोक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राष्ट्रीय स्पर्धेसह यश मिळवलेल्या खेळाडूंचा सत्कार केला. मुख्याध्यापिका सौ. भारती कासार यांनी स्वागत केले. शालेय अहवाल वाचन राशी नावंदर हिने केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख राजवर्धिनी माने, राधिका पाटील, मैत्रयी जाधव यांनी करून दिली. क्रीडा अहवाल वाचन रितेश मनोळे यांनी केले. मुलांच्या चित्रकला व हस्तकला प्रदर्शन मांडले होते. त्यानंतर विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम झाला.
------
व्याख्यानमाला आजपासून
इचलकरंजी : समर्थ रामदास नवमी व नरवीर तानाजी मालुसरे पुण्यतिथीनिमित्त व्याख्यानमाला होणार आहे. लक्ष्मी नरसिंह उपासक मंडळ व राष्ट्रवंदना यांच्यातर्फे १३ ते १५ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. सोमवारी (ता. १३) सध्या परिस्थिती आणि हिंदू कुटुंब या विषयावर सौ. अर्चना रानडे या बोलणार आहेत. मंगळवारी (ता. १४) जगण्याचा मंत्र संत महंताची चरित्र या विषयावर प्रथमेश इंदुलकर, तर बुधवारी (ता. १५) समर्थ रामदास स्वामींचे बोध विचार या विषयावर श्रीधर कुलकर्णी व सौ. प्राची कुलकर्णी हे बोलणार आहेत. तसेच त्यानंतर नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा सच्चिदानंद कानिटकर हे सादर करणार आहेत. व्याख्याने दररोज सायंकाळी सहा वाजता नरसोबा कट्टा गावभाग येथे होणार आहेत. तरी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com