पालेभाज्यांचा पुरवठा मागणीपेक्षा अधिक

पालेभाज्यांचा पुरवठा मागणीपेक्षा अधिक

05636
इचलकरंजी : १) विक्रेत्यांकडे तमिळनाडूच्या कलिंगडाची आवक वाढली आहे.
05635
२) कोवळ्या काकडी दाखल होत आहेत.
-----------
पालेभाज्यांचा पुरवठा मागणीपेक्षा अधिक
लिंबूच्या दरात शेकडा १०० ते १५० रुपयांनी वाढ; इचलकरंजीत कलिंगड विक्रीचे स्टॉल
इचलकरंजी, ता. १६ : भर उन्हातही पालेभाज्यांचा जोर वाढतच आहे. बाहेरून होणारी आवक वाढत असून, होणारा पुरवठा मागणीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे बाजारात पालेभाज्या नाशवंत होण्याचे प्रमाण अधिक आहे. या आठवड्यात लिंबूच्या दरात प्रतिशेकडा १०० ते १५० रुपयांची कमालीची वाढ झाली आहे. शेवग्याची आवक आता सुधारली असून, जोडी दहा रुपयाला मिळत आहे.
धान्य बाजारात आवक वाढल्याने गव्हाचे दर उतरले असून, तूरडाळीच्या दरात वाढ झाली आहे. फळबाजारात कलिंगडाला मागणी वाढली आहे. कलिंगड विक्रीचे स्टॉलही लागले आहेत. त्याबरोबर अननस आणि तोतापुरी आंब्याची आवक वाढली आहे. कोवळ्या काकडी हळूहळू दाखल होत आहेत. फुलांना तेजी कायम असून, दर चढे आहेत. निशिगंध, गुलाबाच्या दरात आणखी वाढ झाली आहे. शिवजयंती, महाशिवरात्रीमुळे दर आणखी भडकण्याची शक्यता आहे. खाद्यतेलाचे भाव उतरू लागले आहेत.
----
प्रति किलो रुपये भाजीपाला : टोमॅटो-१५ ते २०, दोडका- ५० ते ६०, वांगी- ३० ते ४०, कारली- ४० ते ५०, ढोबळी मिरची- ४० ते ५०, मिरची -५०ते ६०, फ्लॉवर- १५ ते २०, कोबी-१५ ते २०, बटाटा- २५ ते ३०, कांदा -१५ ते २०, लसूण- ८० ते १००, आले- ६० ते ८०, लिंबू- २०० ते ४०० शेकडा, गाजर -३० ते ४०, बीन्स- ४०ते ५०, ओला वाटाणा- ३०ते ४०, चवळी शेंगा -७० ते ८०, भेंडी- ६० ते ८०, काकडी- ४० ते ५०, गवार- ८० ते १००, रताळे -३० ते ४०, दुधी-३० ते ४०, पालेभाज्या ५ ते ७ रुपये, शेवगा ५ रुपये नग.
- - - - - - - -
खाद्यतेल : सरकी -१२५ ते १३०, शेंगतेल - १७५ ते १८०, सोयाबीन- १३० ते १३५, पामतेल - ११० ते ११५, सूर्यफूल -१३५ ते १४०.
- - --- - - -
फुले : झेंडू - ८० ते १००, निशिगंध- ३५०, गुलाब - २५०-३००, गलांडा- ८० ते १००, शेवंती- १६० ते १८० आष्टर- १५० ते २००.
- - - -- - -
फळे : सफरचंद- ८० ते १६०, संत्री -६० ते १००, मोसंबी-८० ते १००, डाळिंब-८० ते १५०, चिकू- ८० ते १२०, पेरू-३० ते १००, सीताफळ - ८० ते १००, खजूर - १५०-२००, द्राक्षे- १०० ते १५०, कलिंगड -५६ ते ६०, पपई- ३० ते ५०, अननस -८० ते १००, मोर आवळा -८० ते १००, द्राक्षे- १८०-२००, केळी- ५० ते ६० डझन, देशी केळी -५० ते ६० डझन, किवी -२०० ते २२०, स्ट्रॉबेरी- ५० ते ६० (लहान बॉक्स), चिंच-१०० ते १४०, लेची -३५० ते ४००.
-- -
कडधान्य : हायब्रीड ज्वारी- ३१ ते ४८, बार्शी शाळू- ४० ते ५०, गहू- ३१ ते ३७, हरभराडाळ -५८ ते ६३, तुरडाळ- १०८ ते ११५, मूगडाळ-९५ ते १००, मसूरडाळ- ७६ ते ७८, उडीदडाळ- ९० ते १००, हरभरा- ५२ ते ५६, मूग- ८५ ते ९३, मटकी- १३० ते १३५, मसूर- ७०, फुटाणाडाळ- ७० ते ७२, चवळी-७५ ते ८३, हिरवा वाटाणा- ५५, छोला -१२५ ते १४०.
- - - - - - - - - - - -
देशीपेक्षा वसई कडक
बाजारात केळीचा तुटवडा तीव्र जाणवत आहे. वसई केळी विक्रेत्यांकडे शोधून सापडेना झाली आहे. देशी केळीची आवक टिकून असून, वसई केळीची आवक विकस्टली आहे. त्यामुळे देशीपेक्षा वसईचे दर अधिक आहेत. वाढत्या महागाईमुळे विक्रेते शक्कल लढवत मागणीनुसार केळीची मागणी करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com