रेवा कुंभार हिची निवड

रेवा कुंभार हिची निवड

05638
रेवा कुंभार
रेवा कुंभार हिची निवड
इचलकरंजी : इचलकरंजी हायस्कूलची खेळाडू रेवा कुंभार हिची राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कोल्हापूर जिल्हा आर्चरी संघटना व महाराष्ट्र राज्य आर्चरी संघटना यांच्या मान्यतेने मिणचे येथे जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धा झाल्या. यावेळी तिने प्रथम क्रमांक मिळवला. तिची लातूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. संस्थेच्या मानद सचिव डॉ. सौ. सपना आवाडे, मुख्याध्यापिका श्रीमती व्ही. एच. उपाध्ये यांनी अभिनंदन केले. तिला प्रशिक्षक शिवम स्वामी, क्रीडाप्रमुख व्ही. एम. गुरव, डी. वाय. कांबळे, बी. एम. थोरवत यांचे मार्गदर्शन लाभले.
----
सेवालाल महाराजांना अभिवादन
इचलकरंजी : रोटरी डेफ स्कूल येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. सुहास गायकवाड यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. श्री. गायकवाड यांनी सेवालाल महाराजांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. स्मिता रणदिवे यांनी केले. सौ रुपाली सलगर यांनी आभार मानले. भरत पवार यांनी साइन दुभाषिकाचे काम केले. महानगरपालिकेतर्फेही अभिवादन करण्यात आले. प्रभारी उपायुक्त (कर) केतन गुजर यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. नगररचनाकार रणजित कोरे, वाहन अधीक्षक राजेंद्र मिरगे, जनसंपर्क अधिकारी नितीन बनगे आदी उपस्थित होते.
---
वधू-वर मेळावा माहिती पुस्तकाचे प्रकाशन
इचलकरंजी : येथील धनगर समाजोन्नती मंडळाच्या वधू-वर मेळावा माहिती पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. आमदार प्रकाश आवाडे, जनता बँकेचे चेअरमन स्वप्नील आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन झाले. मंडळातर्फे राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा झाला. मेळाव्यात नोंदणी केलेल्या इच्छुक वधू-वर यांच्या माहितीचे हे पुस्तक आहे. मंडळाचे अध्यक्ष शंकर पुजारी, उपाध्यक्ष कलाप्पाण्णा गावडे, राजू पुजारी, अरविंद पुजारी, अनिल पुजारी, प्रणव पुजारी, विनायक हेरवाडे, राम बत्ते आदी उपस्थित होते.
----
मारवल स्कूलचे यश
इचलकरंजी : मारवल स्कूलने ओलम्पियाड परीक्षेत यश मिळवले. विद्यार्थ्यांनी अकरा सुवर्णपदके प्राप्त करत उल्लेखनीय कामगिरी केली. दिव्या शेखावत, गणेश केशरवानी, सोहेल खान, ज्ञानेश्वरी गावडे, स्नेहा शिंदे, पवन यादव, पवन चौधरी, शिवांशू केशरवाणी, प्राजक्ता कडगंची, शौर्य शेवाळे, संभव बमन्नवर यांनी यश मिळवले. विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक प्रा. नंदराज पवार, प्राचार्या शुभांगी पवार, प्राची कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.
---
‘नॅशनल’च्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
इचलकरंजी : मालाबार गोल्ड चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेत नॅशनल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजने यश मिळवले. अठरा विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये शिष्यवृत्ती मिळाली. विद्यार्थ्यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष धोंडीलाल शिरगावे, उपाध्यक्ष दस्तगीर मोमिन, अहमद मुजावर, नजीर खलिफा, राशीद गवंडी, मन्सूर मुजावर, लतीफ गैबान, शहाजहान शिरागावे उपस्थित होते. मुख्याध्यापक श्री. अन्सारी यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com