शिबिरामधून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास

शिबिरामधून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास

ich262.jpg
85423
चंदूर : कन्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या निवासी श्रमसंस्कार शिबिराच्या उद्‍घाटनप्रसंगी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी मार्गदर्शन केले.

शिबिरामधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास
कौस्तुभ गावडे; चंदूरमध्ये कन्या महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिर
इचलकरंजी, ता.२६ : राष्ट्रीय सेवा योजनासारख्या शिबिरामधून विद्यार्थी घडत असतानाच त्यांचा सर्वांगीण विकास होतो. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांची ज्ञानगंगा अशा कार्यक्रमांमधून वाढीस लागत आहे. शिबिरातून गावासोबत विद्यार्थिनींचाही विकास आणि संघटितपणे केलेल्या कार्यातून गावामध्ये रचनात्मक आणि विकासात्मक कार्य घडते, असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी व्यक्त केले.
येथील श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या सातदिवसीय निवासी श्रमसंस्कार शिबिर मौजे चंदूर येथे आयोजित केले आहे. शिबिराच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सभापती महेश पाटील होते. प्रमुख पाहुणे जिल्हा परिषदचे माजी सदस्य राहुल आवाडे म्हणाले, ‘श्रमसंस्कार शिबिरातून विद्यार्थिनींचा आत्मविश्वास वाढीस लागतो. जीवनात येणाऱ्या अनेक प्रतिकूल परिस्थितींना तोंड देण्याचे पाठबळ यातून मिळते. भारताचा सक्षम नागरिक याच विचारातून घडत असतो. यातून नारी शक्तीचा जागर होऊन जगण्याची ऊर्जा निर्माण करतो.’
स्वागताध्यक्ष प्रभारी प्राचार्या (प्रो.) डॉ त्रिशला कदम यांनी शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. ‘युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास’ हे ब्रीद घेऊन या शिबिराचे आयोजन केले आहे. या सात दिवसांतील अनुभव, श्रमातून होणारे संस्कार हे आयुष्यभर उपयोगी पडत असतात त्यातून जगण्याला नवे बळ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले सरपंच सौ. अनिता माने, उपसरपंच संजय जिंदे, प्रा. संगीता पाटील, प्रा. सोमनाथ गायकवाड, डॉ. प्रियांका कुंभार, प्रा. स्वप्नील वाकडे, प्रा. रामेश्वरी कुदळे आदी उपस्थित होते. प्रा. वर्षा पोतदार यांनी सूत्रसंचालन केले. प्रा संदीप पाटील यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com