
संशोधक वृत्तीला चालना द्या
ich283.jpg
85806
इचलकरंजी : श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये विज्ञान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्याध्यापक एस. ए. पाटील यांनी मार्गदर्शन केले.
---------
संशोधक वृत्तीला चालना द्या
मुख्याध्यापक एस. ए. पाटील; गंगामाई गर्ल्स हायस्कूलमध्ये विज्ञान दिन
इचलकरंजी, ता. २८ : विज्ञान दिवस म्हणजे सर्व शास्त्रज्ञांच्या कष्टाची आठवण करून देणारा दिवस आहे. विद्यार्थ्याने विज्ञानाची कास आता वेळीच धरली पाहिजे. आपल्या अवतीभवती निसर्गात घडणाऱ्या घटनांमागील वैज्ञानिक सत्य जाणून घेऊन संशोधक वृत्तीला चालना द्यावी, असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे आदर्श शिक्षक मुख्याध्यापक एस. ए.पाटील यांनी केले.
श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व जुनिअर कॉलेजमध्ये विज्ञान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे बोलत होते. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत भारतीय भौतिक शास्त्रज्ञ व नोबल पुरस्कारप्राप्त चंद्रशेखर वेंकटरामन यांच्या प्रतिमेचे पूजन केले. डोळे उघडून बघा, गड्यांनो झापड लावू नका, या विज्ञान गीताचे सादरीकरण संगीतशिक्षिका सौ. रानडे व विद्यार्थिनींनी केले. विज्ञान हे श्रद्धाशील ज्ञान असून, नव्याचा शोध घ्यायचा व जुन्याचा बोध कसा घ्यायचा, हे विज्ञान आपल्याला शिकवते, असे मत अध्यक्षस्थानावरून उपमुख्याध्यापिका सौ. भस्मे यांनी व्यक्त केले. यावेळी आयोजित पोस्टर प्रदर्शनाचे पारितोषिक वितरणप्रमुख पाहुणे श्री. पाटील यांच्या हस्ते झाले.
पर्यवेक्षक व्ही. एन. कांबळे यांनी प्रास्ताविक केले. विज्ञान विभागप्रमुख बी. बी. रायनाडे यांनी अहवालवाचन केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय आर. एम. गरड यांनी करून दिला. एस. पी. हिंगलजे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन जी. एस. भमणगे यांनी केले. उपप्राचार्य आर. एस. पाटील, पर्यवेक्षक श्री. कांबळे, श्री. पाटील आदी उपस्थित होते.