इचलकरंजी शहरासह भागातील १६ केंद्रावर आज दहावी परीक्षा

इचलकरंजी शहरासह भागातील १६ केंद्रावर आज दहावी परीक्षा

इचलकरंजी शहरासह भागातील
१६ केंद्रांवर आज दहावी परीक्षा
---
शिक्षण विभागाचा राहणार विशेष ‘वॉच’
इचलकरंजी, ता. १ : इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची उद्या (ता. २)पासून बोर्डाची परीक्षा सुरू होत आहे. त्यासाठी शहरासह भागात दोन कस्टडीअंतर्गत १६ परीक्षा केंद्रे असतील. त्यात काही केंद्रे संवेदनशील असून, त्यावर शिक्षण विभागाचा विशेष ‘वॉच’ राहणार आहे. एकूण आठ हजार ९८१ विद्यार्थी परीक्षा देतील. परीक्षेची सुरुवात प्राथमिक भाषेच्या पेपरने होणार आहे.
कॉपीमुक्त परीक्षा व्हावी, परीक्षेतील गैरप्रकारांना लगाम बसावा, यासाठी पहिल्यांदाच यावर्षी बोर्डाने ठोस पावले उचलली आहेत. प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांवर घेऊन येणाऱ्या ‘रनर’वर विशिष्ट जबाबदारी दिली आहे. तसेच, प्रत्येक परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक तास आणि परीक्षेनंतर एक तास, असे एकूण पाच तास बैठे पथक असेल. इयत्ता बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पडत आहेत. आता दहावीच्या परीक्षेसंदर्भातही तेवढेच तगडे नियोजन असेल. परीक्षेपूर्वी प्रत्येक विद्यार्थ्याची अंगझडती घेऊनच त्यांना वर्गात सोडले जाणार आहे. त्यासाठी पोलिसपाटील, अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जाईल. एकाच वर्गात सामूहिक कॉपीचा प्रकार निदर्शनास आल्यास संबंधित केंद्र संचालक व पर्यवेक्षकावर कारवाई केली जाणार आहे.
परीक्षा केंद्राच्या १०० मीटर अंतरातील झेरॉक्स सेंटर, पानपट्टी, टायपिंग, संगणक सेंटर, इंटरनेट कॅफे बंद राहणार आहेत. बारावीप्रमाणे दहावीच्या परीक्षेसाठी काही नियमात शिक्षण मंडळाने सुधारणा केली. त्यानुसार विद्यार्थ्यांना सकाळच्या सत्रातील पेपरसाठी साडेदहाला, दुपारच्या सत्रातील पेपरसाठी अडीचला या निर्धारित वेळेत परीक्षा केंद्रावर पोचावे लागेल. परीक्षेची तयारी शिक्षण मंडळाकडून पूर्ण झाली आहे, अशी माहिती कस्टडीप्रमुख भारती कोळी यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com