
नरंदेकर यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन
05729
इचलकरंजी : सुकुमार नरंदेकर यांच्या ‘पांघरूण आकाशच’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन समारंभ झाला.
नरंदेकर यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन
इचलकरंजी : सुकुमार नरंदेकर यांच्या पांघरूण आकाशच या काव्यसंग्रहाचे प्रकाशन माजी खासदार राजू शेट्टी यांच्याहस्ते झाले. सर्व क्षेत्रात वातावरण अस्थिरेचे झाले आहे. संविधान धोक्यात आलेल्या परिस्थितीत सर्व समाज घटकांनी रस्त्यावर येण्यासाठी विचारवंतांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्री. शेट्टी यांनी केले. आमदार प्रकाश आवाडे, प्रसाद कुलकर्णी, पंचगंगा सहकारी कारखान्याचे चेअरमन पी. एम. पाटील, सुधाकर मणेरे, जयकुमार कोले यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत व प्रास्ताविक प्रा. अनुराधा मांडरे यांनी केले. प्रा. अशोक कांबळे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन सौ. संगीता चव्हाण यांनी केले.
-----
डॉ. सतीश घाटगे यांचे मार्गदर्शन
इचलकरंजी : राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांची स्फुर्ती गीतांमधून जडणघडण होत असते, असे प्रतिपादन प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे यांनी केले. श्रीमती आ. रा. पाटील कन्या महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर मौजे चंदूर येथे सुरू आहे. शिबिराच्या पाचव्या दिवशी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. विविध स्फुर्तीगीते सादर करून स्वयंसेविकांना घाटगे यांनी प्रोत्साहित केले. प्राचार्या प्रो. डॉ. त्रिशला कदम यांची प्रमुख उपस्थित होती. अध्यक्षस्थानीमाजी उपसरपंच बळीराम कदम होते. शिबिराच्या सकाळच्या सत्रात सार्वजनिक वाचनालय परिसराची स्वच्छता केली. मतदार जनजागृती अभियान अंतर्गत स्वयंसेविकांनी चंदुर गावांमधील घरोघरी जाऊन मतदार जनजागृती विषयीचा सर्वे पूर्ण केला.
------
न्यू हायस्कूलमध्ये रंगभरण स्पर्धा
इचलकरंजी : दि न्यू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे शहरस्तरीय प्राथमिक विभागामध्ये रंगभरण स्पर्धा घेतल्या. यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार केला. प्रमुख पाहुणे म्हणून आनंदीबाई कर्वे विद्यामंदिरचे मुख्याध्यापक विकास रामाने व दि न्यू हायस्कूलच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुचिता अलमान यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. ए. पाटील होते. स्पर्धेचे नियोजन बी. ए. कोळी व पी. एस. कोळेकर यांनी केले होते. प्रास्ताविक कोळी यांनी केले. सूत्रसंचालन सौ. बिरनाळे यांनी केले. आभार आंबेकर यांनी मानले.
----
ब्रेन स्टार अकॅडमीचा वर्धापन दिन
इचलकरंजी : ब्रेन स्टार अकॅडमीचा सातवा वर्धापन दिन उत्साहात झाला. शालेय शिक्षणाबरोबर मुलांच्या बौद्धिक विकासासाठी पालकांनी जागरूक असणे गरजेचे आहे, असे मत प्रमुख पाहुणे माजी नगरसेवक नितीन बागे यांनी व्यक्त केले. अनुभाई घो, मोहसीना सय्यद, मृणाल गवळी, कपिल कोळी, मलिका मुल्ला, महेश गवळी, नयन कोळी, शिवाजी घोरपडे आदी उपस्थित होते.