
खुनी हल्ला अटक
05752, 5753, 05754
...
तारदाळ हल्लाप्रकरणी तिघांना अटक
इचलकरंजी, ता.४ : तारदाळ (ता.हातकणंगले) येथील विनोद दत्तात्रय कोराणे यांच्यावर कोयत्याने हल्ला करणाऱ्या तिघाजणांना शहापूर पोलिसांनी अटक केली. राजू उर्फ गिड्या पाटील, रवि उर्फ दीपक दळवी (दोघे.रा तारदाळ), निखिल जोतीराम कांबळे (रा. इचलकरंजी) अशी त्यांची नावे आहेत. जुन्या वादाच्या कारणावरून ठार मारण्याच्या उद्देशाने तिघांनी कोराणे यांच्यावर घरात घुसून शुक्रवारी (ता.३) रात्री खुनी हल्ला केला होता. जखमी कोराणे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोराणे हे ग्रामपंचायतचे माजी सदस्य असून सामाजिक कार्यकर्ते आहेत. चार वर्षांपूर्वी त्यांनी तारदाळ गावातील चंदन बिरादार व त्यांचा भाऊ राजू बिरादार यांच्यात असणारा घरगुती वाद मध्यस्थी करून मिटवला होता. त्याच कारणावरून चंदन बिरादार यांचा भाचा राजू पाटील याने तीन महिन्यांपूर्वी कोराणे यांना फोन करून हुज्जत घातली होती. हाच राग मनात धरून राजू पाटील, दीपक दळवी, निखिल कांबळे हे तिघे तारदाळ येथील हनुमाननगर गल्ली २ मधील कोराणे यांना जीवे ठार मारण्याचे उद्देशाने शुक्रवारी रात्री घरात घुसले. कोयत्याने कोराणे यांच्या डोक्यात, पाठीवर व हाताच्या दंडावर वार केले.या हल्ल्यात कोराणे गंभीर जखमी झाले. जखमी कोराणे यांच्या फिर्यादीनुसार शहापूर पोलीसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पथके रवाना करून तिघांना शहापूर पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली.